एक्स्प्लोर

Share Market : Sensex आणि Nifty म्हणजे काय? डिमॅट अकाऊंट कसं काढायचं? जाणून घ्या सर्वकाही

अलिकडच्या तरुणांचा शेअर मार्केटकडे कल वाढला आहे. पण त्याच वेळी यातील काही संकल्पना नेमक्या काय आहेत हे त्यांना माहिती नसतं. त्या संकल्पना अगदी सोप्या शब्दात सांगणारी ही मालिका....

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारमध्ये नव्या गुंतवणूकदारांचा कल वाढत चालला आहे. 2020 मार्च पासून आतापर्यंत म्हणजेच दीड वर्षाच्या कालावधीत चार कोटीहून अधिक डिमॅट अकाऊंट उघडली गेली. आणि यात सर्वाधिक कल हा 20 ते 35 वयोगटातील तरुणांचा आहे. पण नव्याने येणाऱ्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक कशी करायची याबाबत अनेक प्रश्न असतात. डिमॅट अकाऊंट कसे उघाडयचं?, सेन्सेक्स म्हणजे काय?, निफ्टी 50 म्हणजे काय? या संकल्पना आपण जाणून घेणार आहोत

डिमॅट अकाऊंट कसे उघडायचे?
डिमॅट अकाऊंट (Demat Account) उघडण्यासाठी कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही. शेअर बाजारात तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी झिरोदा, अपस्टॉक, एंजेल ब्रोकिंग असे शेकडो ब्रोकर आहेत. यातील कोणतेही तुमच्या सोयीनुसार अॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करायचं आणि त्यात तुम्ही तुमचे आधार कार्ड डिटेल, पॅन कार्ड डिटेल आणि सध्या तुम्ही वापरत असलेल्या बँक खात्याचे डिटेल्स (खाते क्रमांक आणि रद्द केलेला चेक) द्यायचे. 

या व्यतिरिक्त तुम्ही जो ब्रोकर निवडता त्याची फी काही प्रमाणात असते. ती तुम्हाला द्यावी लागते खाते उघडताना. खाते उघडायला 2 ते 3 दिवसांची प्रक्रिया असते. पण तुम्हाला त्यासाठी कुठेही जावं लागत नाही. घरबसल्या ही प्रक्रिया पार पडते. एकदा का खाते उघडले की तुम्ही गुंतवणूक करायला मोकळे.

सेन्सेक्स म्हणजे काय?
तुम्ही सेन्सेक्स पडला सेन्सेक्स वधारला असे शब्द रोज ऐकत असाल, पण आता सेन्सेक्स म्हणजे काय? सेन्सेक्स म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स. आणि या इंडेक्समध्ये म्हणजेच बॉम्ब स्टॉक एक्सचेंजमध्ये पाच हजारहून अधिक कंपन्या लिस्टेड आहेत. पण यातील निवडक 30 कंपन्यांनी सेन्सेक्स बनलेला असतो. आता या निवडक 30 कंपन्या म्हणजे नक्की कोणत्या? यात प्रत्येक सेक्टरच्या म्हणजे ऑटो, फार्मा, टेक्सटाईल, एफएमसीजी अशा प्रत्येक सेक्टरमधील टॉपची कंपनी आणि ज्यांचं मार्केट कॅपिटल मोठं आहे अशा कंपन्या असतात.

मग आता प्रश्न पडला असेल तुम्हाला निफ्टी 50 मध्ये कोणत्या कंपन्या असतात 

निफ्टी 50 म्हणजे काय?
निफ्टी 50 म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आता याचा इंडेक्सला निफ्टी 50 म्हणतात. यात 1600 कंपन्या लिस्टेड आहेत, ज्यातील टॉपच्या 50 कंपन्या निफ्टी 50 मध्ये येतात. आणि यातही प्रत्येक सेक्टरनुसार इंडेक्स असतात. म्हणजेच जसं सेन्सेक्स, निफ्टी 50 असतो. तसंच बँकेचा बँक निफ्टी, ऑटो सेक्टरचा ऑटो निफ्टी, आयटी सेक्टरचा आयटी निफ्टी, फार्मा सेक्टरचा फार्मा निफ्टी अशाप्रकारे प्रत्येक सेक्टरचा इंडेक्स असतो.

शेअर मार्केट हा यापेक्षा आणखी विस्तृत आहे. जसं आपण एखाद्या कंपनीच्या शेअर बाजारात गुंतवणूक करतो तसंच निफ्टी 50, बँक निफ्टी या इंडेक्समध्ये देखील गुंतवणूक करता येते. ती कशी पुढील भागात पाहुया.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Embed widget