(Source: Poll of Polls)
TCS ने 2000 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेतला मोठा निर्णय, 15 दिवसात रुजू होण्याचे आदेश
आयटी क्षेत्रातील (IT Sector) आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या TCS ने आपल्या कर्मचाऱ्यांच्या (Employees) बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे.
TCS Employees : आयटी क्षेत्रातील (IT Sector) आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या TCS ने आपल्या कर्मचाऱ्यांच्या (Employees) बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या 2000 हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीसनुसार या कर्मचाऱ्यांना 15 दिवसांत रुजू व्हावे लागणार आहे. दिलेल्या तारखेपर्यंत कर्मचारी जर जॉइनिंगच्या ठिकाणी पोहोचले नाहीत तर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.
प्रवास आणि राहण्याचा खर्च कंपनी उचलणार
TCS ने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये कंपनीने प्रवास आणि राहण्याचा खर्च कंपनी उचलणार असल्याची माहिती दिली आहे. NITES ने बिझनेस टुडेला दिलेल्या माहितीनुार, 180 हून अधिक कर्मचार्यांनी युनियनशी संपर्क साधला आणि कंपनीने पाठवलेल्या या अचानक ईमेलबद्दल नाराजी व्यक्त केली. कंपनीने कोणतीही योग्य माहिती आणि सल्लामसलत न करता असा निर्णय घेतल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आयटी युनियनने दाखल केली तक्रार
कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर आयटी युनियनने टीसीएसविरोधात कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा म्हणाले की, या अचानक घेतलेल्या निर्णयामुळं कर्मचाऱ्यांची खूप गैरसोय झाली आहे. त्यामुळं अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. दरम्यान, TCS चे 180 हून अधिक कर्मचारी या संदर्भात NITES कडे गेले आहेत आणि त्यांनी कंपनीने पाठवलेल्या ईमेलवर नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीने कोणतीही योग्य माहिती आणि सल्लामसलत न करता असा निर्णय घेतल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे
तणाव आणि चिंता याकडे दुर्लक्ष करणारी कंपनी
आयटी युनियनचे अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, टीसीएस कंपनी ही कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक समस्या, त्रास, तणाव आणि चिंतांकडे दुर्लक्ष करत आहे. कंपनी कर्मचाऱ्यांना नाहक अडचणीत टाकून त्यांच्या हक्कांचे उल्लंघन करत आहे. मंत्रालयाला योग्य ती कारवाई करण्याची विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मोठ्या प्रमाणावर कर्मचार्यांची काढणी
गेल्या काही काळापासून आयटी क्षेत्राची स्थिती फारशी चांगली नाही, हे उल्लेखनीय. हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांनी, टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत TCS चा अट्रिशन रेट 21.3 टक्के होता
महत्त्वाच्या बातम्या: