Tata Technologies IPO : उद्या टाटा टेक्नोलॉजीचा आयपीओ लिस्टिंग होणार, GMP कडून बंपर लिस्टिंगचे संकेत
Tata Technologies IPO : टाटा टेक्नोलॉजीचा आयपीओ उद्या शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे. गुंतवणूकदारांच्या नजरा याकडे लागल्या आहेत.
Tata Technologies IPO Listing : टाटा समुहाच्या (Tata Group) कंपनीचा 20 वर्षांनंतर पहिल्यांदाचा आयपीओ (IPO) बाजारात दाखल झाला आहे. टाटा टेक्नोलॉजी (TATA Technologies) चा आयपीओ उद्या लिस्टिंग होणार आहे. टाटा समूह (TATA Group) देशातील आघाडीच्या विश्वासू उद्योजकांपैकी एक आहे. टाटा समूहाच्या टाटा टेक्नोलॉजीचा आयपीओ 30 नोव्हेंबरला शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे.
टाटा टेकच्या आयपीओला गुंतवणुकदारांचा भरघोस प्रतिसाद
टाटा टेकचा आयपीओ 30 नोव्हेंबरला एनएसई आणि बीएसईवर लिस्ट होणार आहे. गुंतवणूकदारांसाठी आयपीओ 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या काळात खुला करण्यात आला होता. याला गुंतवणुकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं आहे. टाटा टेक्नोलॉजी (Tata Technologies) च्या IPO ला जबरदस्त सबस्क्रिप्शन मिळालं.
टाटा टेक्लोलॉजीचा आयपीओ उद्या लिस्टिंग होणार
टाटा मोटर्सची सब्सिडिअरी कंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीचा (Tata Technologies) आयपीओ उद्या बाजारात लिस्टिंग होणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनी प्रोडक्ट इंजिनिअरिंग आणि डिजीटल सर्व्हिसेसशी संबंधित कंपनी आहे. टाटा समूहाकडून 2004 नंतर येणारा पहिलाच आयपीओ (TATA Technologies IPO) आहे. त्यामुळे देशभरातील गुंतवणूकदारांच्या याकडे नजरा लागल्या होत्या.
5 डिसेंबरपासून ट्रेडिंग सुरू होणार
या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबरला बोली बंद केल्यानंतर, 30 नोव्हेंबरला टाटा टेक्नॉलोजीचे शेअर्सचे वाटप केले जातील. ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये युनिट्स मिळत नाहीत, त्यांच्यासाठी 1 डिसेंबरपासून त्यांचे पैसे परत देण्यास सुरू होणार आहे. तर, 4 डिसेंबर रोजी यशस्वी बोली लावणाऱ्यांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील. टाटा टेकच्या शेअर्सची शेअर बाजारात लिस्ट 5 डिसेंबरला होणार आहे.
ऑफरच्या 69.43 पट बोली
शेवटच्या दिवशी टाटा टेकचा आयपीओ एकूण 64.43 पट सबस्क्रिप्शनसह बंद झाला. किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांच्या कोट्याच्या 16.50 पट सदस्यता घेतली होती. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी हा IPO 203.41 वेळा सबस्क्राइब केला आहे आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 62.11 वेळा सबस्क्राइब झाला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा कोटा 3.70 वेळा आणि शेअरहोल्डर्सनी 29.19 वेळा सबस्क्रिप्शन घेतलं आहे. या IPO मध्ये, टाटाला 4,50,29,207 शेअर्सऐवजी 3,12,63,97,350 शेअर्ससाठी बोली मिळाली आहे. ही ऑफर केलेल्या बोलीच्या 69.43 पट आहे.