Swiggy Employee : कर्मचाऱ्याचा दणका, स्विगीला फटका! तब्बल 33 कोटी रुपयांची केली फसवणूक, नेमकं काय घडलं?
Swiggy Employee : एका कर्मचाऱ्याने स्विगीचं मोठं नुकसान केलं आहे. स्विगीच्या (Swiggy) म्हणण्यानुसार, या माजी कनिष्ठ कर्मचाऱ्याने 33 कोटी रुपयांची फसवणूक (fraud) केली आहे.
Swiggy Employee : एका कर्मचाऱ्याने फूड डिलिव्हरी (Food Delivery) प्लॅटफॉर्म असलेल्या स्विगीचं मोठं नुकसान केलं आहे. स्विगीच्या (Swiggy) म्हणण्यानुसार, या माजी कनिष्ठ कर्मचाऱ्याने 33 कोटी रुपयांची फसवणूक (fraud) केली आहे. स्विगीसाठी हा मोठा धक्का आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. स्विगीने या कर्मचाऱ्याचे नाव उघड केलेले नाही. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. मात्र, एका छोट्या कर्मचाऱ्याने एवढा मोठा घोटाळा केल्याने कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
स्विगीने आपल्या वार्षिक अहवालात फसवणुकीच्या संदर्भातील माहिती दिली आहे. या माजी कर्मचाऱ्याने त्याच्या एका उपकंपनीसह हा घोटाळा केला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्विगीनं दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षापर्यंत हा घोटाळा तिच्या एका उपकंपनीसह झाला होता. या माजी कर्मचाऱ्याने त्यांची एकूण 32.67 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती वार्षिक अहवालात दिली आहे. याबाबत माहिती मिळताच कायदेशीर प्रक्रियेची मदत घेतली जात आहे. Zomato च्या मुख्य प्रतिस्पर्धी Swiggy साठी ही वाईट बातमी आहे. एक छोटा कर्मचारी एवढ्या मोठ्या कंपनीचा विश्वासघात कसा करु शकतो, असा प्रश्न लोक विचारत आहेत.
Swiggy चा IPO 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त
स्विगीने अलीकडेच आपला आयपीओ लॉन्च करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे आपले आयपीओ पेपर सादर केले होते. एप्रिलमध्ये दाखल केलेल्या दस्तऐवजानुसार, आयपीओ लॉन्च करण्यासाठी ते गोपनीय मार्गाचा वापर करणार आहे. कंपनीला IPO द्वारे अंदाजे 10,414 कोटी रुपये उभे करायचे आहेत. यापैकी 3,750 कोटी रुपयांचा नवीन इश्यू असेल आणि ऑफर फॉर सेलद्वारे 6,664 कोटी रुपये उभे केले जातील.
2024 मध्ये 2,350 कोटी रुपयांचा तोटा
मिळालेल्या माहितीनुसार, स्विगीला आर्थिक वर्ष 2024 मध्ये 2,350 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र, कंपनीचा तोटा 44 टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये 4,179 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीचा महसूलही 36 टक्क्यांनी वाढून 11,247 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी हा आकडा 8265 कोटी रुपये होता. स्विगीचे एकूण ऑर्डर मूल्यही 26 टक्क्यांनी वाढून 402 अब्ज रुपये झाले आहे. स्विगीने दिलेल्या माहितीनुसार इंस्टामार्टचा व्यवसायही वेगाने वाढत आहे.
महत्वाच्या बातम्या: