Swiggy : स्विगीवरून जेवण मागवताय? लवकरच त्यावर अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल, स्विगीकडून प्लॅटफॉर्म फी दुप्पट करण्याची शक्यता
Swiggy Platform Fees : स्विगीने त्याच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये संभाव्य वाढीसाठी चाचणी देखील सुरू केल्याचं समोर आलं असून त्यामुळे त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.
Swiggy Platform Fees : फूड डिलिव्हरी अॅग्रीगेटर स्विगी (Swiggy) त्याचा IPO बाजारात आणणार असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून आहेत. पण आयपीओ लाँच करण्यापूर्वी कंपनी असा निर्णय घेणार आहे ज्याचा थेट परिणाम खाद्यपदार्थ ऑर्डर (Online Food) करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. स्विगी त्याची प्लॅटफॉर्म फी वाढवण्याच्या तयारीत आहे. स्विगी सध्या प्लॅटफॉर्म फी म्हणून प्रति ऑर्डर 5 रुपये आकारत आहे. ते आता दुप्पट करण्यात येणार असून यापुढे ते 10 रुपये इतके आकारण्यात येणार आहे. मनीकंट्रोलमध्ये यासंबंधित एक वृत्त प्रसिद्ध झालं असून स्विगीने त्याच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये संभाव्य वाढीसाठी चाचणी देखील सुरू केली असल्याचं त्यामध्ये म्हटलं आहे.
स्विगीवर सध्याचे प्लॅटफॉर्म शुल्क 5 रुपये (Swiggy Platform Fees)
स्विगीकडून सध्या त्याच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ करण्यासाठी चाचणी सुरू आहे. कंपनीच्या व्यवसाय धोरणाचा भाग म्हणून हे एक पाऊल महत्त्वाचं मानलं जाऊ शकते. एप्रिल 2023 मध्ये स्विगीने प्रति वापरकर्ता 2 रुपये नाममात्र शुल्क आकारण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला ते काही ग्राहकांवर लागू केले गेले आणि नंतर ते सर्व ग्राहकांसाठी वाढवण्यात आलं. सध्या स्विगीवर सध्याचे प्लॅटफॉर्म शुल्क 5 रुपये आहे.
स्विगी इंस्टामार्टवर किराणा उत्पादनेदेखील उपलब्ध (Swiggy Instamart)
Swiggy ने किराणा मालाच्या खरेदीसाठी Swiggy Instamart प्लॅटफॉर्म लाँच केला आहे आणि कंपनी प्रत्येक ऑर्डरवर निश्चित रकमेपेक्षा जास्त रकमेवर डिलिव्हरी शुल्क आकारत नाही. साधारणपणे फ्री डिलिव्हरी सुविधा ही 199 रुपयांच्या किमान ऑर्डरवर उपलब्ध आहे.
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, स्विगीच्या प्रवक्त्याने प्लॅटफॉर्म फी वाढवण्यासंबंधी भाष्य केलं. स्विगीच्या प्रवक्त्याने सांगितलं की, कंपनीने प्लॅटफॉर्म फी सध्या तरी वाढवली नाही आणि नजीकच्या काळात कोणतीही मोठी वाढ करण्याची योजना समोर नाही. आमच्या ग्राहकांच्या आवडी निवडी समजून घेण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयोग करत असतो. हा एक छोटासा प्रयोग होता आणि जर आमच्या ग्राहकांना सुविधा देण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही तर आम्ही कदाचित भविष्यात त्याचा वापर करणार नाही.
फूड डिलिव्हरी मार्केटला सध्या मंदीचा सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम स्विगीवरदेखील झाला असून त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
ही बातमी वाचा: