एक्स्प्लोर

स्विगीच्या आयपीओबाबत महत्त्वाची अपडेट, 'या' दिवसापासून गुंतवणूक करता येणार? पैसे ठेवा तयार!

IPO Investment Update : गेल्या काही दिवसांपासून स्विगीच्या आयपीओची चर्चा होत आहे. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी कधी खुला होणार, याची गुंतवणूकदार वाट पाहात आहेत.

Swiggy IPO: गेल्या काही दिवसांपासून फूड डिलीवरी प्लेटफॉर्म स्विगीच्या आयपीओची सगळीकडे चर्चा आहे. मिंट या अर्थविषयक वृत्त देणाऱ्या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या एका वृत्तानुसार हा आयपीओ नोव्हेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या आयपीओची संभाव्य तारीखही समोर आली आहे. हा आयपीओ 11.3 अब्ज डॉलर्सचा असण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वी स्विगी ही कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून एकूण 15 अब्ज डॉलर्स रुपये जमवणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र सध्याची बाजाराची स्थिती आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा कल पाहता या कंपनीने आपल्या आपयीओच्या मूल्यात घट केली आहे. देशातील आताप र्यंतच्या ह्युंदाई मोटर्स या सर्वांत मोठ्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र शेअर बाजारावर सूचिबद्ध झाल्यानंतर या कंपनीच्या शेअरचे मूल्य कमी झाले होते. ही बाब लक्षात घेऊनही स्विगीने आपल्या आयपीओचे मूल्य कमी केले आहे, असे म्हटले जात आहे. 

आयपीओ नेमका कधी येणार?  

मिळालेल्या माहितीनुसार स्विगी कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 6 नोव्हेंबर 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. साधारण 30 पेक्षा अधिक अँकर इन्व्हेस्टर्स स्विगीच्या आयपीओत गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आयपीओ खुला होण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. 

स्विगीचा आयपीओ नेमका कसा असू शकतो? 

स्विगी कंपनीकडून भांडवली बाजार नियामक संस्था सेबीकडे नव्याने डीआरएचपी सादर करण्यात आला होता. या डीआरएचपीनुसार स्विगी या आयपीओच्या माध्यातून एकूण 3750 कोटी रुपयांचे शेअर विकण्याची शक्यता आहे.  तर सध्याचे शेअर होल्डर्स 18.52 कोटी रुपयांचे शेअर्स विकण्याची शक्यता आहे.  

स्विगीची कोणत्या कंपन्यांशी टक्कर

स्विगी या कंपनीची झोमॅटो, झेप्टो टाटा उद्योग समूहाची बिगबास्केट या कंपन्यांशी थेट स्पर्धा आहे. स्विगी कंपनीची प्रमुख प्रतिस्पर्धी झोमॅटोदेखील आपल्या उद्योग विस्तारासाठी भांडवल उभं करण्याच्या प्रयत्नात आहे. झोमॅटो क्वालिफाईड इन्स्टीट्यूशनल प्लेसमेंटच्या माध्यमातून पैसे उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. जुलै 2021 मध्ये झोमॅटो कंपनीचा आयपीओ आला होता. या कंपनीच्या आयपीओचा आकार 9375 कोटी रुपये होता. गेल्या एका वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअरमध्ये 136.68 टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली आहे. 
 
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा : 

Waaree energy : आयपीओ आला तेव्हा तुफान चर्चा, लिस्टिंगच्या एक दिवस आधी धक्कादायक माहिती समोर; गुंतवणूकदारांत धाकधूक!

दागिने तयार करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस, दिवाळीनिमित्त एका शेअरवर दिले तब्बल 9 शेअर मोफत!

आला रे आला नवा आयपीओ आला! गुंतवणुकीसाठी आता शेवटचे तीन दिवस; जाणून घ्या संपूर्ण माहिती

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावरून 27 टक्क्यांपर्यंत घसरल्या; नेमकी काय आहेत कारण? 
Gold Rate : सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावरून 27 टक्क्यांपर्यंत घसरल्या; नेमकी काय आहेत कारण? 
Swaraj Engines : 'स्वराज इंजिन्स'चा ऐतिहासिक रेकॉर्ड! पहिल्यांदाच 2 लाखांहून अधिक विक्री; गुंतवणूकदारांना मिळणार प्रति शेअर 110 रुपये लाभांश
'स्वराज इंजिन्स'चा ऐतिहासिक रेकॉर्ड! पहिल्यांदाच 2 लाखांहून अधिक विक्री; गुंतवणूकदारांना मिळणार प्रति शेअर 110 रुपये लाभांश
RM Drip & Sprinklers : FII मुळे 20 रुपयांखालील पेनी स्टॉकमधील हिस्सा वाढला; शेअरला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट; 100 कोटींच्या 'या' करारामुळे गुंतवणूकदारांची चांदी!
FII मुळे 20 रुपयांखालील पेनी स्टॉकमधील हिस्सा वाढला; शेअरला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट; 100 कोटींच्या 'या' करारामुळे गुंतवणूकदारांची चांदी!
'क्वालिटी वॉल्स'च्या शेअरमध्ये जूनमध्ये 35 टक्क्यांची वाढ; मॅग्नमसोबतच्या 'या' करारामुळे गुंतवणूकदार मालामाल!
'क्वालिटी वॉल्स'च्या शेअरमध्ये जूनमध्ये 35 टक्क्यांची वाढ; मॅग्नमसोबतच्या 'या' करारामुळे गुंतवणूकदार मालामाल!

व्हिडीओ

Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report
Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime: रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
Embed widget