श्रीमंतांच्या यादीत उलथापालथ, 'या' उद्योजकाची टॉप-10 मध्ये एन्ट्री, देशातील सर्वात श्रीमंतांची यादी एका क्लिकवर
देशातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या पहिल्या 10 जणांच्या यादीत सुनील मित्तल या उद्योजकाचा समावेश झाला आहे. सुनिल मित्तल (Sunil Mittal) यांच्यासाठी 2024 हे चालू वर्ष चांगले गेल आहे.
Richest Indian: देशातील श्रीमंतांच्या (Richest Indian) यादीत सातत्यानं उलथापालथ होत आहे. उद्योजकांच्या संपत्तीत थोडा चढ उतार झाला की लगेच स्थानात घसरण होते. दरम्यान, देशातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या पहिल्या 10 जणांच्या यादीत सुनील मित्तल या उद्योजकाचा समावेश झाला आहे. सुनिल मित्तल (Sunil Mittal) यांच्यासाठी 2024 हे चालू वर्ष चांगले गेल आहे. तर लक्ष्मी मित्तल हे टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून वगळले गेलेत.
भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये मोठी वाढ
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम सुनील मित्तल यांच्या संपत्तीत मोठी वाढ झालीय. मित्तल यांनी देशातील सर्वात दहा श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. 2024 मध्ये मित्तल यांच्या संपत्तीत मोठी वाढ झालीय. मिळालेल्या माहितीनुसार सुनिल मित्तल यांच्या संपत्तीत 2024 मध्ये 3.8 अब्ज डॉलरची वाढ झालीय. तर दुसरीकडे स्टील टायकून आणि आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांच्या संपत्तीत घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या संपत्तीत 1 बिलीयन डॉलरची घट झालीय.
सुनिल मित्तल यांची एकूण संपत्ती किती?
सर्वांनाच प्रशअन पडला असेल की सुनिल मित्तल यांची एकूण संपत्ती किती? तर सुनिल मित्तल यांची एकूण संपत्ती ही 19.7 अब्ज डॉलर आहे. ते आता भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दहाव्या स्थानावर आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार मित्तल हे 13 व्या क्रमांकावर होते. मात्र, भारती एकरटेलच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळं सुनिल मित्तल हे दहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मित्तल यांनी आता डीएलएफ लिमिटेडचे सीईओ केपी सिंग आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना मागे टाकलं आहे.
सुनील भारती मित्तल यांच्याकडे भारती एअरटेलमध्ये 28 टक्के हिस्सा आहे. तर भारती हेक्साकॉममध्येही त्यांची 70 टक्के भागीदारी आहे. भारती हेक्साकॉमचे मूल्य अंदाजे 6 अब्ज डॉलर आहे. तर भारती एअरटेलचे मूल्य 91.84 अब्ज डॉलर आहे. देशात फक्त रिलायन्स, टीसीएस आणि एचडीएफसी बँकेचे मूल्यांकन या कंपनीपेक्षा जास्त आहे. भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीचा मोठा फायदा झाला आहे. या शेअर्समध्ये 1.84 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या शेअर्स वाढून 1289 रुपयांवर बंद झाला आहे.
देशातील 10 श्रीमंत व्यक्ती कोण?
मुकेश अंबानी - 112.6 अब्ज डॉलर
गौतम अदानी - 97.5 अब्ज डॉलर
शापूर पल्लोनजी मिस्त्री - 37.2 अब्ज डॉलर
शिव नाडर - 34.2 अब्ज डॉलर
सावित्री जिंदाल - 31.0 अब्ज डॉलर
अझीम प्रेमजी - 25.3 अब्ज डॉलर
दिलीप सांघवी - 24.9 अब्ज डॉलर
राधाकृष्ण दमानी - 21.9 अब्ज डॉलर
सायरस पूनावाला - 20.2 अब्ज डॉलर
सुनील मित्तल - 19.7 अब्ज डॉलर