हॉटेलमधील भांडी घासून महिन्याला मिळायचे 18 रुपये, आज आहे 300 कोटींच्या कंपनीचा मालक
आज शून्यातून स्वत:चं अस्तित्व निर्माण केलेले अनेक लोक आहेत. यातील एक नाव म्हणजे सागररत्ना रेस्टॉरंट्सचे (Sagararatna Restaurants) मालक जयराम बनान (Jayaram Banan). पाहुयात त्यांची यशोगाथा.
Success Story: कष्ट करण्याची तयारी आणि इच्छाशक्तीच्या बळावर सामान्य माणूस मोठं यश मिळवू शकतो. आज शून्यातून स्वत:चं अस्तित्व निर्माण केलेले अनेक लोक आहेत. यातील एक नाव म्हणजे सागररत्ना रेस्टॉरंट्सचे (Sagararatna Restaurants) मालक जयराम बनान (Jayaram Banan). जयराम यांना सहजासहजी यश मिळालं नाही. त्यांनी मोठ्या कष्टानं यश मिळवलं आहे. ऐकेकाळी त्यांनी महिन्याला फक्त 18 रुपये मिळायचे, आज ते 300 कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक झाले आहेत.
कोणतेही मोठे यश मिळवण्यासाठी सतत मेहनत करावी लागते. मोठे यश मिळविण्यासाठी, दीर्घ परिश्रम देखील आवश्यक आहेत. जयराम बनन यांनी देखील असेच केले आहे. जे एकेकाळी लोकांची भांडी धुवायचे, ज्यासाठी त्यांना महिन्याला फक्त 18 रुपये मिळायचे. पण आपल्या मेहनतीच्या जोरावर आज त्यांनी 300 कोटी रुपयांची कंपनी उभारली आहे. जयराम यांच्याकडे ऐकेकाळी जेवण आणि राहण्यासाठी पैसे नव्हते.
वयाच्या 13 व्या वर्षी ते घरातून पळाले
जयराम बनन यांचा जन्म कर्नाटकातील मंगळुरु येथील 'उडुपी' येथे एका सामान्य कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडीलांची गरिबी होती. ते ड्रायव्हर म्हणून काम करायचे. जयराम यांना वडिलांची खूप भीती वाटत होती. एकदा शालेय परीक्षेत नापास झाल्यावर वडिलांच्या मारहाणीच्या भीतीने वयाच्या 13 व्या वर्षी ते घरातून पळून गेले. वडिलांच्या खिशात असणारे काही पैसे त्यांनी सोबत घेतले. 1967 मध्ये जयराम बनन मंगळूरहून मुंबईत पोहोचले. त्यांना मुंबईत कोणतंही काम नव्हते, राहायला कोठेही जागा नव्हती. एक-दोन दिवसांच्या जेवणासाठी खिशात फक्त पैसे होते. जयराम मुंबईतील एका रेस्टॉरंट मालकाला ओळखत होते. या रेस्टॉरंटमधून त्यांनी कामाला सुरुवात केली. जिथे लहान वयामुळं आणि कामाचा अनुभव नसल्यामुळं त्यांना लोकांची भांडी धुण्याचे काम मिळाले. या कामासाठी त्यांना महिन्याला फक्त 18 रुपये मिळायचे. हे काम त्यांनी सलग सहा वर्षे केले. यानंतर त्यांच्या कामाचा विचार करून त्यांना वेटर आणि नंतर मॅनेजर करण्यात आले. मॅनेजर झाल्यानंतर त्यांचा पगार 200 रुपये झाला. यातूनच त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची कल्पना सुचली.
1986 मध्ये दिल्लीत 'सागर' नावाचे पहिले रेस्टॉरंट
1974 मध्ये जयराम आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी दिल्लीला गेले. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी गाझियाबादमधील सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे कॅन्टिंग हाताळले. यानंतर, काही बचत आणि मित्रांकडून उधार घेतलेल्या पैशातून त्यांनी 1986 मध्ये दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनीमध्ये 'सागर' नावाचे पहिले रेस्टॉरंट उघडले. लोकांनी जयरामच्या रेस्टॉरंटचे खूप कौतुक केले. लोकांना त्याची साउथ इंडियन डिश खूप आवडली. हे पाहून त्याने दिल्लीच्या लोधी मार्केटमध्ये दुसरे रेस्टॉरंट उघडले. यानंतर हळूहळू त्यांची अनेक रेस्टॉरंट सुरू झाली.
भारतासह परदेशात अनेक रेस्टॉरंट्स
आज जयराम यांचे केवळ देशातच नाही तर सिंगापूर, बँकॉक आणि कॅनडातही रेस्टॉरंट्स आहेत. लोक त्यांना 'उत्तरेचा डोसा किंग' म्हणूनही ओळखतात. सध्या त्यांची जगभरात 100 हून अधिक रेस्टॉरंट्स आहेत.
महत्वाच्या बातम्या: