इंजिनीअरिंगची नोकरी सोडून टोमॅटोची शेती, आज मिळवतोय लाखोंचा नफा
success story : एका तरुणाने इंजिनीअरिंगची नोकरी (Engineering Job) सोडून टोमॅटोची शेती यशस्वी शेती केली आहे. आज त्या तरुणाची यशोगाथा (success story) पाहणार आहोत.
success story : अलिकडच्या काळात अनेक तरुण शेतकरी (Farmers) शेतीत नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. यामाध्यमातून लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. तर काही तरुण हातची नोकरी सोडून प्रयोगशील शेती करत आहेत. आज आपण अशाच एका तरुणाने इंजिनीअरिंगची नोकरी (Engineering Job) सोडून टोमॅटोची शेती यशस्वी शेती केली आहे. आज त्या तरुणाची यशोगाथा (success story) पाहणार आहोत. आज आपण झारखंडमधील (Jharkhand) जमशेदपूर येथील राजेश रंजन या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आाहोत.
शिक्षणानंतर अनेकजण नोकरी शोधतात. नोकरीसाठी गावातील शेती सोडून शहरात जातात. तर काही तरुण लागलेली नोकरी सोडून शेती करतात. झारखंडमधील जमशेदपूर येथील तरुण शेतकरी राजेश रंजन याने इंजिनीअर झाल्यानंतर लागलेली नोकरी सोडली आहे. त्याने गावाकडे प्रयोगशीलशेती सुरु केली आहे. सरकारच्या मदतीने राजेशने पॉलिहाऊस बांधले आहे. यामध्ये त्यांनी दोन प्रकारचे टोमॅटो पिकवले आहेत. यातून आज तो लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे. राजेश हा जमशेदपूरच्या लोडीह या छोट्या गावात राहतो.
पॉलीहाऊस बांधून टोमॅटोची लागवड
राजेशने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तो शहरातून परतला, तेव्हा त्याला येथील शेतकरी खूप मेहनती आहेत आणि येथील जमीन खूप सुपीक असल्याचे समजले. फक्त इथे आधुनिक तंत्रज्ञानाची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. पंतप्रधान योजनेचा लाभ घेत राजेशने एफपीओ स्थापन केला आणि यामध्ये त्याला फलोत्पादन विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाचे पूर्ण सहकार्य मिळाले. त्यानंतर त्याने गावात पॉलीहाऊस बांधले आणि त्यात टोमॅटोची लागवड केली, त्यात त्यांना चांगला नफा मिळत आहे.
पॉलीहाऊसमध्ये लावली टोमॅटोची 600 झाडे
शेतकरी राजेशने त्यांच्या पॉलीहाऊसमध्ये 600 टोमॅटोची रोपे लावली आहेत. ही झाडे 8 फूट ते 12 फूट उंचीची असून 250 ते 300 किलो टोमॅटोचे उत्पादन मिळते. सुरुवातीला तो 60 रुपये किलोने टोमॅटोची विक्री झाली. पण आता जिथे टोमॅटोचे दर उतरले आहेत. सध्या टोमॅटोला 10 ते 12 रुपये किलो असा दर मिळत आहे. या स्थितीत देखील राजेशला या हंगामातच 80000 रुपयांची कमाई झाली आहे. तसेच येथील राहणाऱ्या एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो आणि काकडीची लागवड केली आहे. ज्यामध्ये मी टोमॅटोच्या दोन जाती लावल्या आहेत. टोमॅटोमध्येही कलम होते, त्यामुळे उत्पादन वाढल्याची माहिती शेतकऱ्याने दिली.
महत्वाच्या बातम्या: