शिक्षण फक्त 9 वी पास, 500 रुपयात सुरु केला व्यवसाय, तरुण आज करतोय लाखो रुपयांची उलाढाल
9 वी शिक्षण घेतलेल्या तरुणाने अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून व्यवसायाच्या माध्यमातून भरारी घेतली आहे. कृष्णदेव रोकडे असं सोलापूरच्या या तरुणाचं नाव आहे.
Success story : अलिकडच्या काळात अनेक तरुण विविध प्रकारचे व्यवसाय (Business) करुन मोठा नफा मिळवत आहेत. काहीजण नोकरी (Job) सोडून देखील यशस्वी व्यवसाय करत आहेत. तर कमी शिक्षण झालेले तरुण देखील यशस्वी व्यवसाय करताना दिसत आहेत. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा (Success story) पाहणार आहोत. या तरुणाने 9 वी शिक्षण घेऊनसुद्धा व्यवसायाच्या माध्यमातून भरारी घेतली आहे. कृष्णदेव रोकडे असं सोलापूरच्या या तरुणाचं नाव आहे.
सोलापूरच्या कृष्णदेव रोकडे यांनी 500 रुपयांपासून स्वीट कॉर्न (Sweet Corn) विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. आज ते दरमहा 40 ते 45 हजार रुपये कमावत आहेत. रोकडे हे दर वर्षाला या व्यवसायातून 13 ते 14 लाख रुपये कमावत आहेत. ज्यामुळं तरुणांना प्रेरणा मिळत आहे. आजकाल अनेत तरुण वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायात नशीब आजमावत आहेत. यापैकी काही व्यवसाय आधीच बाजारात आहेत आणि काही नवीन आहेत. परंतु असे काही लोक आहेत जे कठीण आणि आव्हानात्मक व्यवसाय निवडतात आणि त्यात यश मिळवतात. सोलापूर जिल्ह्यातील कृष्णदेव रोकडे यांनीही असाच व्यवसाय निवडला आहे. त्यांनी स्वीट कॉर्न विकण्याचा व्यवसाय सुरू केला आणि आज ते या व्यवसायातून ते लाखो रुपये कमवत आहेत.
500 रुपयांमध्ये स्वीट कॉर्न विकण्याचा व्यवसाय सुरू
कृष्णदेव मधुकर रोकडे हे पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावचे रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण 9 वी पर्यंत झाले आहे. परंतु त्यांचा संघर्ष आणि मेहनतीनं त्यांना यश मिळवून दिलं आहे. 2012 मध्ये कृष्णदेव यांनी अवघ्या 500 रुपयांमध्ये स्वीट कॉर्न विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला त्याला ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला, पण त्याने हार मानली नाही. हळूहळू स्वीट कॉर्न खाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आणि त्यांचा व्यवसायही विस्तारू लागला.
मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल
आज कृष्णदेवचा स्वीट कॉर्नचा व्यवसाय सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, अंगार, कामठी आणि कुरुलपर्यंत पसरला आहे. लोक त्यांच्या शंभूराज ब्रेकफास्ट सेंटरमध्ये स्वीट कॉर्न चाखण्यासाठी येतात. 500 रुपयांपासून सुरू झालेल्या या व्यवसायातून त्यांना आता दरमहा 40 ते 45 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रथम एका हॉटेलपासून व्यवसाय सुरू करणाऱ्या कृष्णदेव यांनी आता एकाच हॉटेलमध्ये तीन हॉटेल्स बांधली आहेत. तिन्ही हॉटेलमध्ये स्वीट कॉर्न विक्रीचे काम सुरू आहे. या तिन्ही हॉटेलमधून ते दरवर्षी 13 ते 14 लाख रुपयांचा व्यवसाय करत आहेत.