रश्मिका मंदन्ना आणि विजय देवरकोंडा यंदाच्या इंडिया डे परेडचे ग्रँड मार्शल; न्यूयॉर्कमध्ये उमटणार भारतीय संस्कृती
India Day Parade 2025 : न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या 43व्या ‘इंडिया डे परेड’मध्ये परंपरागत संगीत, नृत्य, मोठी रथयात्रा यासह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : जागतिक स्तरावर भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे सर्वात मोठे आणि आकर्षक परेड, 43वा India Day Parade, रविवार, 17 ऑगस्ट 2025 रोजी न्यूयॉर्कमधील Madison Avenue वर रंगणार आहे. या महोत्सवाला रंगत आणतायत भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन चमकदार तारका, रश्मिका मंदन्ना आणि विजय देवरकोंडा. या दोघांना यंदा Grand Marshals म्हणून विशेष मान दिला आहे.
न्यूयॉर्क येथील भारताच्या कन्सुलेट जनरल कार्यालयात पार पडलेल्या 27 जून रोजीच्या उद्घाटन समारंभात FIA (Federation of Indian Associations) ने याची घोषणा केली होती. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स (FIA) तर्फे आयोजित या परेडसंदर्भात नुकतीच भारतीय वाणिज्य दूतावास, न्यूयॉर्क येथे घोषणा करण्यात आली.
या कार्यक्रमात दोन्ही कलाकारांनी सहा भाषांमध्ये – हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी – एकत्रित व्हिडिओ संदेश देत आमंत्रणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि 17 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होण्याची उत्सुकता दर्शवली.
यंदाची थीम काय?
या वर्षीच्या परेडचा थीम आहे – “सर्वे भवंतु सुखिनः – जागतिक कल्याणासाठी जागतिक पुढाकार”. परेडची सुरुवात 15 ऑगस्ट रोजी पारंपरिक ध्वजारोहणाने होईल. मुख्य परेड 17 ऑगस्ट रोजी मॅडिसन अॅव्हेन्यूवरून भव्य स्वरूपात पार पडेल.
India Day Parade 2025 New York : कसा असेल सोहळा?
15 ऑगस्ट: Empire State Building या प्रसिद्ध इमारतीवर भारतीय तिरंग्याच्या ध्वजारोहणाने या कार्यक्रमाची सुरुवात होईल.
16 ऑगस्ट: न्यूयॉर्कमधील Times Square मध्ये पारंपरिक ध्वजवंदनाचे आकर्षक स्वातंत्र्यदिनीकरण सोहळा रंगेल.
17 ऑगस्ट : या दिवशीच्या कार्यक्रमानिमित्त Madison Avenue वर रंगणाऱ्या परेडमध्ये रंगीबेरंगी floats, परंपरागत संगीत, नृत्य, मोठी रथयात्रा आणि शेवटी Cipriani Wall Street मधील Grand Gala सोहळा हे आकर्षण ठरणार आहे. या उत्सवात हजारो प्रवासी भारतीय आणि अनिवासी भारतीय सहभागी होणार आहेत. तसेच या कार्यक्रमाद्वारे केंद्रस्थानी आलेल्या भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि एकात्मतेचा उत्सव जगभरासमोर उभा केला जाणार आहे.
'इंडिया डे परेड' हा भारताबाहेर होणारा सर्वात मोठा स्वातंत्र्य दिन सोहळा मानला जातो. दरवर्षी हजारो भारतीय आणि भारतीय वंशाचे नागरिक यात सहभागी होतात. या वर्षी रश्मिका आणि विजय यांची उपस्थिती या सोहळ्याला आणखी आकर्षण मिळवून देणार आहे.
ही बातमी वाचा:
























