Share Market Today : शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, मात्र थोडक्यात सावरला; सेन्सेक्स 70600 वर तर निफ्टी 21300 वर
Stock Market Opening : आज पहिल्या सत्रात शेअर बाजार (Share Market) सुरु होताच पडझड झाली, पण त्यानंतर आता वाढीसह व्यवहार सुरु आहे.
Stock Market Update : भारतीय शेअर बाजारात (Share Market) आज काहीशी निराशाजनक सुरुवात पाहायला मिळाली आहे. मंगळवारी शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली होती. आज बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. पण, त्यानंतर पहिल्याच तासात बाजारात हिरव्या रंगात म्हणजे वाढीसह व्यवहार सुरु असल्याचं दिसत आहे. आज पहिल्या सत्रात शेअर बाजार सुरु होताच पडझड झाली, पण त्यानंतर आता वाढीसह व्यवहार सुरु आहे. आज सकाळी 9 वाजूव 54 मिनिटांनी सेन्सेक्स 221.95 अंकांनी म्हणजेच 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 70.592 वर व्यवहार करत होता. तर नॅशनस स्टॉक इक्सचेंजचा निफ्टी 0.36 टक्क्यांच्या वाढीसर 76.25 अंकांसह 21315 वर व्यवहार करत होता.
शेअर बाजाराची सुरुवात कशी झाली?
आजही देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह उघडला. BSE सेन्सेक्स 205.06 अंकांच्या किंवा 0.24 टक्क्यांच्या घसरणीसह 70,165.49 च्या पातळीवर उघडला. NSE चा निफ्टी 53.55 अंक किंवा 0.25 टक्क्यांच्या घसरणीसह 21,185 च्या पातळीवर उघडला.
BSE सेन्सेक्स शेअर्सची स्थिती
सेन्सेक्सचे 30 पैकी 19 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 11 शेअर्समध्ये घसरण होत आहे. सेन्सेक्सच्या टॉप गेनर्स शेअर्सच्या यादीत इंडसइंड बँक पहिल्या क्रमांकावर आहे, इंडसइंड बँक शेअर्स 1.60 टक्क्यांनी वाढले आहे. त्यानंतर टाटा स्टील 1.36 टक्के आणि भारतीय स्टेट बँक (SBI) 1.23 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. इन्फोसिस 1.05 टक्के आणि एचसीएल टेक 0.97 टक्क्यांची वाढ झाली आहे.
निफ्टी स्टॉकची स्थिती
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या 50 निफ्टी शेअर्सपैकी 30 शेअर्समध्ये वाढ तर 20 शेअर्समध्ये घट झाली आहे. निफ्टीच्या सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्सपैकी हिंदाल्को 3.22 टक्क्यांनी आणि माइंडट्री 1.07 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे. त्यासोबतच डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या शेअर्समध्येही एक टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर कोल इंडियाचे शेअर्स 0.99 टक्क्यांनी वाढले आहेत. इन्फोसिस 0.88 टक्क्यांनी घसरणीसह व्यवहार करत आहे.
'या' शेअर्समध्ये वाढ (Top Gainers Stocks)
आरईसी, पावर फायनान्स, भारती इंफ्रटेल, नाल्को, आदित्य बिरला या शेअर्सची घोडदौड सुरु आहे. यासोबतच हिंदाल्को, डॉ. रेड्डीज लॅब, इंडसइंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ब्रिटॅनिया, पावरग्रीड कॉर्प, हिंदुस्तान युनिलिव्हर हे स्टॉक्स वाढीसह व्यवहार करत आहेत.
'या' शेअर्समध्ये घसरण (Top Loosers Stocks)
ऑबेरॉय रियल्टी, डेल्टा कॉर्प, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, हिरो मोटोकॉर्प, इचर मोटर्स, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट या निफ्टी शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :