Stock Market Closing: सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर ट्रेंड बदलला, सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला, अमेरिका कनेक्शन कारणीभूत
Stock Market Closing: सलग दोन दिवस भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाले होते. सेन्सेक्स आणि निफ्टी आज दीड टक्क्यांनी घसरुन बंद झाले.
Stock Market Closing मुंबई: भारतीय शेअर बाजार आज बंद होत असताना घसरणीसह बंद झाला. भारतीय शेअर बाजारात आज घसरण होईल अशी अपेक्षा अनेकांना नव्हती मात्र मोठ्या प्रमाणात घसरणीचं सत्र पाहायला मिळालं. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरणीसह बंद झाले. बँकिंग क्षेत्रातील शेअर आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये घरसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरण झाली तर निफ्टी 24 हजारांपेक्षा खाली बंद झाली.
बाजार बंद होताना काय स्थिती होती?
सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 1.5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाल्याचं पाहायला मिळालं. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या निर्देशाकांत घसरण झाली. बीएसईवर सेन्सेक्स 1190.34 अकांच्या घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्समध्ये 1.48 घसरण पाहायला मिळाली तो 79043 वर बंद झाला. एनएसईवर निफ्टी 360.75 अकांनी म्हणजेच 1.49 टक्क्यांनी घसरुन 23914 वर बंद झाल्याचं पाहायला मिळतं.
कोणत्या कंपन्यांचे शेअर घसरले
सेन्सेक्समध्ये ज्या कंपन्यांचे स्टॉक्स घसरले त्यामध्ये इन्फोसिसचा समावेश आहे. इन्फोसिसचे शेअर्स 3.46 टक्क्यांनी घसरले. एम अँड एम, बजाज फायनान्स, एचसीएल टेक, अदानी पोर्टस, टेक महिंद्रा कंपन्यांचे शेअर्स घसरले. सेन्सेक्सवरील 30 कंपन्यांपैकी केवळ एका कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. स्टेट बँकेच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
निफ्टी 50 वर केवळ 4 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली तर 46 शेअर्स घसरले. एसबीआय, श्रीराम फायनान्स आणि सिप्ला कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. निफ्टीवर एसबीआय लाईफच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली, या कंपनीचा शेअर 5.41 टक्क्यांनी घसरला. एचडीएफसी लाईफ, एम अँड एम, इन्फोसिस, अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
अमेरिका कनेक्शनचा परिणाम
अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका याशिवाय व्याज दरात कपात देखील करण्याची शक्यता आहे. त्यामुळं भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला.
इतर बातम्या :
IPO Update : पैसे तयार ठेवा, आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार,गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
चांदीनं घेतली मोठी उसळी! एकाच दिवसात दरात आत्तापर्यंतची विक्रमी वाढ, खरेदीदारांना धक्का
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)