(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPO Update : पैसे तयार ठेवा, आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार,गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Suraksha Diagnostic IPO Price Band: सुरक्षा डायग्नोस्टिक कंपनीचा आयपीओ बोली लावण्यासाठी उद्यापासून खुला होणार आहे. ही कंपनी भांडवली बाजारातून 846 कोटींची उभारणी करणार आहे.
Suraksha Diagnostic IPO मुंबई : सुरक्षा डायग्नोस्टिक कंपनीचा आयपीओ (Suraksha Diagnostic IPO) शेअर बाजारातून पैशांची उभारणी करण्यासाठी उद्या खुला होणार आहे. 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान आयपीओ सबस्क्रिप्शन करण्यासाठी खउला असेल. या कंपनाची आयपीओच्या माध्यमातून 846 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा पर्यत्न आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 34 शेअर असून गुंतवणूकदारांना कमीत कमी 14280 रुपये तर कमाल 19994 रुपयांची बोली लावावी लागेल. या कंपनीच्या आयपीओतील समभागाच्या किंमत 420-441 दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.
आरोग्य आणि डायग्नोस्टिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या सुरक्षा डायग्नोस्टिकचा आयपीओ सबस्क्रिप्शन 29 नोव्हेंबरला सुरु होई. 3 डिसेंबरपर्यंत या आयपीओत बोली लावता येईल. तर, 4 डिसेंबरला शेअर अलॉट केले जातील. 5 डिसेंबरला गुंतवणूकदारांना रक्कम परत केली जाईल. 5 तारखेलाच डीमॅट खात्यात शेअर क्रेडिट केले जातील. 6 डिसेंबरला बीएसई आणि एनएसईवर सुरक्षा डायग्नोस्टिकचा आयपीओ लिस्ट होईल.
सुरक्षा डायग्नोस्टिकचा आयपीओद्वारे भाडंवली बाजारातून 846.25 कोटी रुपये उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीनं शेअरची दर्शनी किंमत 2 रुपये ठेवली आहे. याच्या समभागाची किंमत 420-441 रुपयांदरम्यान ठेवण्यात आलेली आहे. गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी 34 रुपये मिळतील. यासाठी 14994 रुपये लावावी लागतील. रिटेल गुंतवणूकदारांना 13 लॉट खरेदी करता येतील. त्यांना यासाठी 194,922 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या आयपीओत संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के कोटा राखीव आहेत. रिटेल गुंतवणूकदारांना 35 टक्के तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांना 15 टक्के शेअर राखीव असतील.
आयसीआयसीआय सिक्यूरिटीज (ICICI Securities), नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (Nuvama Wealth Management Ltd) आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स (SBI Capital Markets) सुरक्षा डायग्नोस्टिक हे आयपीओचे लीडर मॅनेजर्स आहेत. कॅफिन टेक्नोलॉजी लिमिटेड आयपीओचं रजिस्ट्रार आहे. सुरक्षा डायग्नोस्टिकच्या आर्थिक स्थितीचा आढवा घेतल्यास 2023-24 मध्ये कंपनीचं उत्पन्न 14.75 टक्क्यांनी वाढून 222.6 कोटींवर पोहोचलं. तर कंपनीचा फायदा 281 टक्क्यांनी वाढून 23.13 कोटी रुपये झाला आहे. या कंपनीची स्थापना 2005 मध्ये झाली. सुरक्षा डायग्नोस्टिक पॅथोलॉजी, रेडियोलॉजी,आणि मेडिकल कन्सलटन्सी सेवा देते. कंपनी प्रामुख्यानं काम पश्चिम बंगाल, बिहार, आसाम आणि मेघालय मध्ये आहे.
इतर बातम्या :
EPFO खात्यातून किती रक्कम काढल्यास कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही, जाणून घ्या महत्त्वाचा नियम
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)