(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Stock Market Opening: आठवड्याच्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स गडबडला; काय आहे शेअर मार्केटची स्थिती?
Stock Market Opening: डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 81.10 वर उघडला आहे. याचा आयातीवर थेट परिणाम होणार आहे.
Stock Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आहे. निफ्टी बँक आणि आयटी क्षेत्रात घसरणीमुळे शेअर बाजार घसरला आहे. आज मेटल्स आणि वाहनांच्या मार्केटमध्ये काहीशी उसळी पाहायला मिळाली मात्र ही उसळी बाजाराला वर आणण्यात यशस्वी ठरली नाही.
आज मार्केटच्या ओपनिंगला बीएसई 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 114.54 अंकांच्या किंवा 0.19 टक्क्यांच्या घसरणीसह 59,005 वर उघडला. दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 35.95 अंक किंवा 0.20 टक्क्यांच्या कमजोरीसह 17,593 वर उघडला. व्यवसाय सुरू झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांतच बाजार घसरत सेन्सेक्स 59,000 च्या खाली घसरला. सेन्सेक्स 269.57 अंकांनी घसरून 58,850 वर आला आहे. निफ्टी 75 अंकांनी घसरून 17,554 च्या पातळीवर आला आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टीचे शेअर्स
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी आज सेन्सेक्समधील 30 पैकी 7 शेअर्स वाढले आहेत आणि 23 शेअर्स घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. तर निफ्टीच्या 50 पैकी 15 शेअर्स घसरले आहेत आणि वाढणाऱ्या शेअर्सशी संख्या 35 आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वाढले
सेन्सेक्सच्या चढत्या शेअर्समध्ये आज टाटा स्टील 1.35 टक्क्यांनी घसरत आहे. याशिवाय सन फार्मा, एचयूएल, आयटीसी, डॉ रेड्डीज लॅब्स, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांच्यासोबत टायटनचे शेअर्स वाढल्याचं दिसत आहे.
सेन्सेक्समधील घसरण
नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, विप्रो, एल अँड टी, एसबीआय, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पॉवरग्रीड, एचडीएफसी, टेक महेंद्र HCL Tech, M&M आणि IndusInd Bank चे शेअर्स घसरले आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर
डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 81.10 वर उघडला आहे. याचा आयातीवर थेट परिणाम होणार आहे. यामुळे अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. काल रुपया डाॅलरच्या तुलनेत ८९ पैशांनी कमकुवत होत ८०.८६ प्रति डाॅलरवर बंद झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या