Share Market : शेअर बाजार आपटला, Sensex 802 अंकांनी तर Nifty 215 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 1.75 लाख कोटी रुपडे बुडाले
Stock Market Closing Update : बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 377.13 लाख कोटी रुपयांवरून घसरून ते 375.38 लाख कोटी रुपयांवर आले आहे.
मुंबई : सोमवारी शेअर बाजारात (Stock Market) असलेली तेजी मंगळवारी कायम राहू शकली नाही, मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाक सेन्सेक्समध्ये 802 अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 215 अकांची घसरण झाली. एनर्जी आणि कंझ्युमर ड्युरेबल स्टॉक्समध्ये नफेखोरी दिसून आल्याने शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं सांगितलं जातंय.
सेन्सेक्समध्ये आज 802 अंकांची घसरण होऊन तो 71, 139 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 215 अंकांची घसरण होऊन तो 21, 522 अंकांवर पोहोचला.
मार्केट कॅपमध्ये घसरण
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 375.38 लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे गेल्या सत्रात 377.13 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.75 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
इंडेक्सचे नाव | बंद झालेला स्तर | उच्च स्तर | निम्न स्तर | बदललेली टक्केवारी |
BSE Sensex | 71,139.90 | 72,142.23 | 71,075.72 | -1.11% |
BSE SmallCap | 44,900.90 | 45,213.00 | 44,851.18 | 0.00 |
India VIX | 16.10 | 16.58 | 14.99 | 2.69% |
NIFTY Midcap 100 | 47,791.95 | 48,296.40 | 47,731.85 | -0.39% |
NIFTY Smallcap 100 | 15,673.80 | 15,817.40 | 15,657.35 | 0.00 |
NIfty smallcap 50 | 7,263.30 | 7,331.95 | 7,255.60 | 0.00 |
Nifty 100 | 21,846.20 | 22,120.35 | 21,826.05 | -0.89% |
Nifty 200 | 11,829.60 | 11,974.00 | 11,819.60 | -0.81% |
Nifty 50 | 21,522.10 | 21,813.05 | 21,501.80 | -0.99% |
आजच्या व्यवहारात एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, कमोडिटी, इन्फ्रा, एफएमसीजी, फार्मा आयटी, ऑटो, बँकिंग क्षेत्रातील समभाग बाजारात घसरणीसह बंद झाले. केवळ धातू, रिअल इस्टेट आणि मीडिया शेअर्समध्ये वाढ झाली आहे. आजच्या व्यवहारात मिड कॅप समभागांमध्ये घट झाली तर स्मॉल कॅप समभाग वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 25 तोट्यासह आणि 5 वाढीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 समभागांपैकी 14 समभाग वाढीसह बंद झाले तर 36 समभाग तोट्यासह बंद झाले.
कोणत्या कंपन्यांना फायदा झाला?
आजच्या व्यवहारात बीपीसीएल 2.34 टक्के, टाटा मोटर्स 2.12 टक्के, ग्रासिम 1.03 टक्के, आयशर मोटर्स 0.97 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 0.86 टक्के, एसबीआय 0.61 टक्के, एचयूएल 0.58 टक्के वाढीसह बंद झाले. बजाज फायनान्स 5.21 टक्के, टायटन 3.39 टक्के, बजाज फिनसर्व्ह 2.83 टक्के, एनटीपीसी 2.80 टक्के घसरून बंद झाले.
शेअर बाजाराची सुरूवात झाली त्यावेळी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं. प्री ओपनिंगमध्ये सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर मार्केटमध्ये तेजी येईल अशी शक्यता वाटत असताना नंतर मात्र शेअर बाजारात घसरण सुरू झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर शेअर बाजारात गुंतवणूकदारांनाही मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं.
ही बातमी वाचा: