शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्सनं ओलांडला 72 हजारांचा टप्पा तर निफ्टी 21900 च्या वर
आज सुरुवातीलाच शेअर बाजारात (Stock market) चांगली तेजी असल्याचं पाहायला मिळालं. काल संध्याकाळी बाजारात दिसून आलेला तेजीचा कल आजही कायम आहे.
Stock Market Opening : आज सुरुवातीलाच शेअर बाजारात (Stock market) चांगली तेजी असल्याचं पाहायला मिळालं. काल संध्याकाळी बाजारात दिसून आलेला तेजीचा कल आजही कायम आहे. सेन्सेक्सने 72 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टी 21900 च्या वर उघडला आहे. तर बँक निफ्टीने 46000 चा टप्पा ओलांडला आहे.
शेअर बाजाराची सुरुवात कशी झाली?
देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात उत्कृष्ट झाली आहे. काल संध्याकाळी बाजारात दिसून आलेला तेजीचा कल आजही कायम आहे. बँक निफ्टी आणि ऑटो शेअर्सच्या वाढीमुळं बाजाराला पाठिंबा मिळाला आहे. BSE चा सेन्सेक्स 238.64 अंकांच्या किंवा 0.33 टक्क्यांच्या वाढीसह 72,061 स्तरावर आणि NSEचा निफ्टी 66.50 अंकांच्या किंवा 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 21,906 स्तरावर उघडला. सकाळी 9.35 वाजता, NSE निफ्टीच्या 50 पैकी 30 समभाग वाढत आहेत. तर 20 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 15 वाढीसह तर 15 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. आज M&M शेअर सेन्सेक्समध्ये सर्वाधिक फायदा झाला आहे आणि 3.68 टक्क्यांनी व्यापार करत आहे. एनटीपीसी 1.51 टक्के आणि टाटा स्टील 1.13 टक्क्यांनी वर आहे. विप्रो 1.01 टक्क्यांनी वाढला.
BSE वर एकूण 3074 समभागांची खरेदी-विक्री
BSE वर एकूण 3074 समभागांची खरेदी-विक्री होत आहे. त्यापैकी 2221 समभाग वाढत आहेत, तर 774 समभाग घसरत आहेत. 74 शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय व्यवहार करत आहेत. 165 शेअर्समध्ये अप्पर सर्किट आणि 88 शेअर्समध्ये लोअर सर्किट लागू करण्यात आले आहे. दरम्यान, निफ्टीच्या सर्वाधिक वाढणाऱ्या पाच समभागांमध्ये बँक समभागांचे वर्चस्व आहे. बँक ऑफ बडोदानं सर्वाधिक 2.33 टक्क्यांनी वाढ केली आहे. यानंतर PNB 1.10 टक्के आणि SBI 0.75 टक्क्यांनी वाढले आहे. एचडीएफसी बँकेने आज पुन्हा गती घेतली असून ती 0.29 टक्क्यांनी वाढली आहे. फेडरल बँक 0.23 टक्क्यांनी वर आहे.
महत्वाच्या बातम्या: