Multibagger Stock: फक्त एकाच वर्षात 1 लाखाचे झाले 55 लाख; गुंतवणूकदारांवर पैशाचा वर्षाव
Multibagger Stock: मल्टीबॅगर शेअर्सबद्दल बोलायचं झालं, तर शेअर बाजारात असे अनेक लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स आहेत. पण यापैकी सूरज प्रॉडक्ट्स काहीसा खास आहे. हा शेअर अल्पावधीतच गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे.
Multibagger Stock: मुंबई : शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक (Investment) करताना नेहमीच तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी सुचवलं जातं. शेअर मार्केट (Stock Market) कधी बक्कळ नफा (Profit) करुन देतं, तर कधी शेअर मार्केटमध्ये पडझड झाली तर अगदीच आहे नाही तेवढं सगळं गमवावं लागतं. म्हणूनच, शेअर मार्केट जोखमीचा असल्याचं बोललं जातं. असं असलं तरीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक दारांची संख्या काही कमी होत नाही. दिवसेंदिवस संख्या वाढतच चालली आहे. कधी एखादा स्टॉकच गुंतवणूकदारांचं नशीब बदलण्यासाठी फायदेशीर ठरतो. याची अनेक उदाहरणं आहेत, ज्या स्टॉक्सनी अनेक गुंतवणूकदारांना दीर्घकाळात, तर काहींनी अल्पावधीतच श्रीमंत केलं आहे. असाच एक मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) म्हणजे, सूरज पॉर्डक्ट शेअर (Suraj Product Shares). या स्टॉकनं अवघ्या चार वर्षांच 1 लाख रुपयांचे सुमारे 55 लाख रुपयांमध्ये रुपांतर केलं आहे.
चार वर्षांत 5400 टक्क्यांचा परतावा
मल्टीबॅगर शेअर्सबद्दल बोलायचं झालं, तर शेअर बाजारात असे अनेक लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स आहेत. पण यापैकी सूरज प्रॉडक्ट्स काहीसा खास आहे. हा शेअर अल्पावधीतच गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या शेअरनं गेल्या चार वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या काळात या कंपनीच्या शेअरची किंमत 8 रुपयांवरून 444.40 रुपयांवर पोहोचली आहे. जर आपण चार वर्षात मिळालेल्या परताव्यावर नजर टाकली तर, जर एखाद्या गुंतवणूकदारानं या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि ते आत्तापर्यंत त्या गुंतवणूकदाराला सुमारे 55 लाख रुपयांचा नफा झाला आहे.
चार्ली मुंगेर यांचं प्रभावी सूत्र
शेअर मार्केटमध्ये नफा कमावण्यासाठी सर्वात मोठा मंत्र म्हणजे, प्रतीक्षा करणं. खरंच, आणि हे आम्ही नाही सांगत आहोत, ज्येष्ठ गुंतवणूकदार आणि वॉरन बफेट यांचे जवळचे मित्र, दिवंगत चार्ली मुंगेर सांगायचे. चार्ली मुंगेर यांना पैशाचे जादूगार देखील म्हटलं जातं. पण चार्ली मुंगेर यांनी सांगितलेलं सूत्र विशेषतः पेनी स्टॉकसाठी योग्य आहे. मुंगेर यांनी सांगितलेल्या गोष्टींचा विचार केल्यास, शेअरमध्ये गुंतवणूक करणं हे एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासारखं आहे, मग त्याचा आकार कितीही असो. म्हणजेच, जर एखादा शेअर गुंतवणुकीसाठी उत्तम असेल तर तो स्मॉल-कॅप, मिड-कॅप किंवा लार्ज-कॅप किंवा अगदी पेनी स्टॉक आहे की नाही हे पाहू नये. शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे बहुधा मल्टीबॅगर परतावा मिळतो, असं साधारणपणे दिसून येतं.सूरज प्रोडक्टचा शेअर्स हा याचं उत्तम उदाहरण आहे.
पाच वर्षांतील शेअरची कामगिरी
सूरज प्रोडक्ट्सच्या शेअर्सच्या कामगिरीवर नजर टाकली, तर गेल्या चार वर्षांत जवळपास 5 हजार 400 टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या पाच वर्षांतील परताव्याचा आकडा 2144.44 टक्के आहे. गेल्या एका वर्षात, हा मल्टीबॅगर स्टॉक बीएसईवर 135 रुपयांवरून 444.44 रुपयांपर्यंत वाढला आहे. याचा अर्थ सुमारे 230 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतकंच नाही तर गेल्या सहा महिन्यांत सूरज प्रॉडक्ट्सच्या स्टॉकची किंमत 96 टक्क्यांहून अधिक वाढली आहे आणि त्याची किंमत 218.65 रुपयांवरून 444.40 रुपयांपर्यंत वाढली आहे.
आर्यन प्रोडक्ट्स बनवणारी कंपनी
सूरज प्रोडक्ट्स लिमिटेड ही आर्यन प्रोडक्ट्स बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी स्पंज आणि पिग आयर्न पुरवते. सूरज प्रोडक्ट्सनं आपलं जाळं संपूर्ण देशभरात पसरवलं आहे. आणि सूरज प्रोडक्ट्सच्या उत्पादनांबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये TMT बार (TMT War), स्पंज आर्यन (Sponge Iron), पिग आर्यन (Pig Iron) आणि एमएस इनगॉट/बिलेट यांचा समावेश आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 506.62 कोटी रुपये आहे. हा स्टॉक त्याच्या गुंतवणूकदारांसाठी सतत फायदेशीर सौदा ठरत आहे. गेल्या एका महिन्यात ज्यांनी या शेअरमध्ये पैसे गुंतवले त्यांना जवळपास 9 टक्के परतावा मिळाला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 455.60 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 116.50 रुपये आहे.