एक्स्प्लोर

SBI QIP : स्टेट बँकेच्या 25000 कोटींच्या क्यूआयपीवर पैशांचा पाऊस, साडे चार पट बोली, देश विदेशातून पैशांचा ओघ

SBI QIP : स्टेट बँक ऑफ इंडियानं क्यूआयपीद्वारे 25000 कोटी रुपयांच्या उभारणीचा निर्णय घेतला होता. एसबीआयच्या क्यूआयपीवर साडेचार पट बोली लागलीय.

SIP QIP मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियानं 25 हजार कोटी रुपयांची उभारणी QIP ला शेअर विक्री करुन करण्याचा निर्णय घेतला होता. आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार स्टेट बँकेच्या QIP योजनेला मोठं यश मिळालं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट योजनेवर साडेचार पट बोली लागली आहे. विशेष बाब म्हणजे ब्लॅकरॉक ग्रुप, अमेरिकेतली मिलेनियम कॅपिटल पार्टनर्स, लंडनमधील हेज फंड मार्शल या सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार एसबीआयच्या 25000 कोटींच्या क्यूआयपीसाठी  120 संस्थांनी 1.10 लाख कोटी रुपयांच्या बोली लावल्या आहेत. 

इकोनॉमिक टाइ्सच्या रिपोर्टनुसार बाजारातील या शेअर विक्रीसाठी देशांतर्गत संस्थांसह विदेशाती संस्थांनी देखील मोठ्या प्रमाणावर बोली लावली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून अशा प्रकारे शेअर विक्री केली जाणं हे क्वचितच घडू शकतं. यामुळं विविध गुंतवणूकदार संस्थांनी स्टेट बँकेच्या क्यूआयपीवर आक्रमकपणे बोली लावली आहे.

भारतातील कोणत्या संस्थांनी बोली लावली?

स्टेट बँकेच्या QIP वर  बोली लावणाऱ्या संस्थांमध्ये भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी), एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्श्युरन्स, क्वांट म्युच्युअल फंड आणि व्हाइट ओक कॅपिटल, एचडीएफसी आणि आयसीआयसीईय प्रुडेंशियल म्युच्युअल फंडनं देखील बोली लावली आहे. रिपोर्टनुसार मार्च 2025 अखेर स्टेट बँक ऑफ इंडियाचा  कॉमन इक्विटी टियर I (CET-1) चं प्रमाण 10.81 टक्के होतं. जे सेबीच्या नियमानुसार 8 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. 

स्टेट बँकेनं  QIP निश्चित करताना एका शेअरची किंमत 811.05 रुपये निश्चित केली आहे. बँक याद्वारे  308.2 दशलक्ष नवे शेअर संस्थात्मक गुंतवणूकादारांसाठी जारी करणार आहे. यामुळं सरकारची बँकेतील भागिदारी 56.92 टक्क्यांवरुन 55.02 टक्क्यांवर येईल.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये घसरण

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्यूआयपीवर मोठ्या प्रमाणावर बोली लागली असली तरी शेअर बाजारात बँकेच्या स्टॉकमध्ये घसरण झाली. एसबीआयच्या स्टॉकमध्ये आज 5.35 रुपयांची घसरण झाली आहे.  बीएसईच्या डेटानुसार देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेचं मार्केट कॅप 735165.58 कोटी रुपये इतकी आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
Embed widget