SIP : मे महिन्याचा पगार होताच एसआयपी सुरु करण्याचा विचार करताय, पैशांचा पाऊस पडणाऱ्या 3 बेस्ट म्युच्युअल फंडबद्दल जाणून घ्या
SIP Investment : एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. एसआयपी सुरु करत असल्यास तीन फंड चांगला परतावा देऊ शकतात. त्याबद्दल जाणून घ्या.

मुंबई : मे महिन्याचा पगार अनेकांच्या खात्यात जमा झाला आहे. अनेकजण फक्त खर्च नाही तर गुंतवणुकीचं नियोजन चांगल्या भविष्यासासाठी करताना पाहायला मिळतात. यासाठी सिस्टमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅन चांगला पर्याय आणि चांगली सुरुवात ठरु शकते. या लेखातून तुम्हाला तीन म्युच्युअल फंड संदर्भातील माहिती मिळेल. ज्यांनी गेल्या 10 वर्षात चांगला परतावा दिला आहे. गुंतवणूकदार सल्लागार देखील या म्युच्युअल फंडला गुंतवणुकीचा चांगला पर्याय मानतात.
निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंड
निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंड सप्टेंबर 2010 मध्ये लाँच करण्यात आला होता. तेव्हापासून चांगला परतावा देणाऱ्या स्मॉलकॅप फंडमध्ये याचा समावेश आहे. छोट्या कंपन्यांमध्ये आणि उद्योगात या फंडद्वारे गुंतवणूक केली जाते. या फंडमधून उच्च परतावा मिळू शकतो, मात्र यामध्ये जोखीम देखील अधिक असू शकते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा म्युच्युअल फंड चांगला आहे. याचा सीएजीआर 23.52 इतका आहे. करोना काळानंतर स्मॉलकॅपमध्ये रिकव्हरी पाहायला मिळाली आहे.
एसबीआय स्मॉलकॅप फंड
हा म्युच्युअल फंड सप्टेंबर 2009 मध्ये लाँच करण्यात आला होता. स्मॉलकॅपमध्ये हा फंड दीर्घकाळापासून चांगली कामगिरी करत आहे. आर. श्रीनिवास आणि मोहन लाल यांच्याकडून फंड मॅनेजमेंट केलं जातं. जे क्वालिटी बेस्ड पोर्टफोलिओ रणनीती राबवतात. या फंडद्वारे विकसित होणाऱ्या नव्या कंपनीची गुंतवणुकीसाठी निवड करतात, चांगल्या फंडामेटल्स आणि स्केलेबल बिझनेस मॉडेल चांगलं असेल त्यांची निवड केली जाते. गेल्या 10 वर्षात या फंडनं 22.61 टक्के रिटर्न दिले आहेत. जोखीम आणि स्थिरता यांच्यामध्ये संतुलन राखणारा फंड गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय आहे. ज्यांना स्मॉलकॅप फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे मात्र जोखीम अधिक नकोय त्यांचासाठी हा फंड चागंला पर्याय आहे.
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड
जे गुंतवणूकदार स्मॉलकॅप फंडमधील जोखमीपेक्षा कमी जोखीम घेऊ इच्छितात मात्र चांगला परतावा हवा आहे त्यांना मोतीलाल ओसवाल मिडकॅफ फंड चांगला पर्याय आहे. फेब्रुवारी 2014 मध्ये लाँच झालेला फंड QGLP म्हणजेच क्वालिटी, ग्रोथ, लाँगेविटी आणि प्राईस या सिद्धांतावर आधारित आहे. या फंडद्वारे मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. गेल्या 10 वर्षात या फंडनं 21.17 टक्के वार्षिक सीएजीआर दिला आहे.
SIP चांगला पर्याय का?
SIP म्हणजेच सिस्टमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅन ज्याद्वारे तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम ज्याद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता. बाजारात चढउतार झाले तरी रुपी कॉस्ट अवरेजिंगचा फायदा गुंतवणूकदारांना होतो. एसआयपीची सुरुवात 500, 1000 रुपयांपासून करु शकता. ज्यामुळं आर्थिक ध्येय पूर्ण होऊ शकतात. निवृत्तीसाठी रक्कम, घर खरेदी, मुलांचं शिक्षण, वेल्थ क्रिएशन याच्या दिशेनं चांगला प्रवास सुरु होतो.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
























