एक्स्प्लोर

Income Tax Return : आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांनी 7 गोष्टी टाळाव्यात, अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता 

Income Tax Return : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय सीबीडीटीनं घेतला आहे. करदात्यांनी आयटीआर फाईल करताना 7 गोष्टी लक्षातं ठेवणं आवश्यक आहे. 

Income Tax Return Filing FY 2024-25 नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं आयटीआर फाईल करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे.आयटीआर फाईल करताना त्यामध्ये कोणतीही चूक राहणं महागात पडू शकतं. आयटीआर फाईल करताना एखादी चूक झाल्यास आयकर विभागाकडून करदात्यांना नोटीस पाठवली जाऊ शकते. त्यामुळं आयटीआर फाईल करण्यास सुरुवात होत असताना  काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. 

आयटीआर भरण्याची मुदत 31 जुलै वरुन 15 सप्टेंबर करण्यात आली आहे. 2024 च्या बजेटमध्ये आयटीआर संदर्भातील काही रचनात्मक दुरुस्त्या करण्यात आल्या त्यानुसार अपग्रेडेशनला वेळ लागणार असल्यानं मुदतवाढ देण्यात आली. करदात्यांनी आयटीआर फाईल करताना 7 गोष्टींची काळजी घ्यावी, त्यामध्ये चुका होणार नाहीत हे लक्षात घ्यावं. आयटीआर फाईल करताना चुका झाल्यास दंड बसू शकतो.

चुकीच्या आयटीआर फॉर्मची निवड टाळा 

अनेकदा करदात्यांकडून आयटीआर फाईल करताना चुकीच्या फॉर्मची निवड केली जाते. याशिवाय आयटीआर फाईल केल्यानंतर त्याची पडताळणी न करणं, डेडलाईन न पाळणं किंवा आयटीआर फायलिंगला महत्त्व न देणं अशा चुका करदात्याकडून केल्या जातात. आंतरराष्ट्रीय प्रवासात तुम्ही जर 2 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला, 1 लाख रुपये वीजेच्या वापरावर किंवा इतर गोष्टींवर खर्च केल्यास आयटीआर फाईल करावा लागतो. 

AIS ची  पडताळणी न करणं

करदाते अनकेदा अॅन्युअल इन्फोरमेशन स्टेटमेंट आणि फॉर्म 26 एएसची पडताळणी आयटीआर सबमिट करण्यापूर्वी करणं आवश्यक आहे. या कागदपत्रात आर्थिक व्यवहारांची आणि कराच्या पेमेंटसची सर्वसमावेशक माहिती त्यामध्ये असते. 

उत्पन्नाची अपूर्ण माहिती जाहीर करणं

उत्पन्नाच्या स्त्रोताची माहिती नं सादर करणं, हे जाणीवपूर्वक असो किंवा अनावधानानं घडलं असो त्याचे आर्थिक परिणाम भोगावे लागतात. यामुळं 50 ते 200 टक्क्यापर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. याशिवाय अतिरिक्त व्याज द्यावं लागू शकतं किंवा संभाव्य कायदेशीर कारवाईला सामोरं जावं  लागू शकतं.

अर्थसंकल्पातील बदल जाणून घ्या 

अर्थसंकल्पात ज्या गोष्टी जाहीर करण्यात आल्या, त्यासंदर्भातील बदल लक्षात घ्यावा. बदलेल्या आयटीआर फॉर्ममुळं कम्प्लायन्स संदर्भातील बदल जाणून घेऊन ते पूर्ण करावेत. 

करमुक्त उत्पन्नाची नोंद न करणं

आयटीआर कायद्यातील तरतुदीनुसार आणि अर्थसंकल्पातील निर्णयानुसार काही उत्पन्न करमुक्त केलं जातं. मात्र, अनेकदा  उत्पन्नाची बेरीज करताना काही जण करमुक्त उत्पन्न टाळण्याची चूक करु शकतात, ती टाळावी. 

नोकरी बदलल्यास कोणती काळजी घ्यावी

आर्थिक वर्षाच्या काळात अनेकदा काही जण नोकरी बदलत असतात.  त्यामुळं मूळ करमुक्त उत्पन्न आणि डिडक्शनची दोनवेळा नोंदणी होऊ शकते. यामुळं उत्पन्न प्रमाणपत्र दोन्ही नियोक्त्यांकडे दिली जातात त्यावेळी स्वतंत्रपणे अधिक मूळ करमुक्त मर्यादेसाठी अर्ज करावा. स्टँडर्ड डिडक्शन, चॅप्टर सहा ए डिडक्शन, यामुळं अतिरिक्त कर लाभाकडे जाऊ शकतो.

घरभाडे भत्ता नोंदवताना चुका टाळाव्यात

घरभाडे भत्ता यासंदर्भातील चुकीचे दावा केल्यास दंड लागू शकतो. त्यामुळं लागणारा दंड 200 टक्क्यांपर्यंत असू शकतो. जुन्या कर प्रणालीत पगारदार व्यक्तींकडून एचआरएचं एक्झम्पशनसाठी अर्ज करावा लागतो.  योग्य दाव्यासोबत अधिकृत भाडे करार, जर घरभाडं एक लाखांपेक्षा अधिक असेल तर घरमालकाचं पॅन कार्ड याची माहिती नियोक्त्याकडे देणं आवश्यक आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Embed widget