एक्स्प्लोर

Aadhaar Card :आधार कार्ड मोफत अपडेटसाठी शेवटचे काही दिवस शिल्लक, मुदत संपल्यानंतर किती शुल्क भरावं लागणार?

Free Aadhaar Card Update : मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत 14 जूनला संपणार आहे. त्यानंतर आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी शुल्क द्यावं लागेल.

Free Aadhaar Card Update नवी दिल्ली : आधार कार्डमधील माहिती मोफत अपडेट करायची असल्यास केवळ 12 दिवस राहिले आहेत. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत 14 जूनपर्यंत आहे. आधार कार्ड धारकाला त्याच्या ओळखीसंदर्भात आणि पत्ता या संदर्भातील माहिती मोफत अपडेट करण्याची मुदत 14 जूनपर्यंत आहे. यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं या संदर्भातील माहिती दिलेली आहे. 14 जूननंतर कोणत्याही प्रकारच्या अपडेटसाठी आधार नोंदणी केंद्रावर भेट देऊन 50 रुपये शुल्क द्यावं लागेल. 

यूआयडीएआयच्या नियमानुसार आधार कार्ड धाकराला ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा आधार नोंदणीच्या 10 वर्षानंतर अपडेट करणं आवश्यक आहे. आधार रेकॉर्ड अपडेट ठेवण्यासाठी ही पूर्तता करणं आवश्यक आहे. 

मोफत आधार कार्ड ऑनलाईन अपडेट कसं करायचं?

1. यूआयडीएआयच्या वेबसाईटला भेट देऊन माय आधार पोर्टलवर जा.
2. तुमच्या 12 अंकी आधार क्रमांकासह आणि कॅप्चा कोड नोंदवा.
3. तुम्हाला  आधार कार्डशी नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल त्याद्वारे पडताळणी करा. 
4.लॉगीन केल्यानंतर तुमच्या तिथं उपलब्ध असलेला ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा पाहा. 
5. जर तुम्हाला त्यामध्ये दुरुस्ती करायची असल्यास डॉक्युमेंट अपडेट पर्यायवर क्लिक करा. 
6. तुम्हाला जे कागदपत्रं अपडेट करायचं आहे त्याची निवड करुन स्पष्ट दिसणाऱ्या कागदपत्राला अपलोड करा. 
7. तुम्ही अपलोड करत असलेली फाईल जेपीईजी, पीएनजी, पीडीएफ फॉरमॅटमध्ये असावी. ती फाईल 2 एमबी पेक्षा मोठी नसावी. 
8.तुमची माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या, त्यानंतर सबमिट अपडेट रिक्वेस्ट पर्यायावर क्लिक करा. यानंतर सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर नोंदवून ठेवा, पुढील अपडेटसाठ त्याचा फायदा होईल. 


कोणती कागदपत्रं जमा करावी लागणार? 

ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा कागदपत्रं : रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शासनानं कडून देण्यात आलेलं ओळखपत्र, भारताचा पासपोर्ट

ओळखीचा पुरावा कागदपत्रं : पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, शाळेचं गुणपत्रक, फोटो असलेला शाळा सोडल्याचा दाखला, शासनांचं पत्ता नसलेलं ओळखपत्र

पत्त्याचा पुरावा कागदपत्रं : अलीकडच्या काळातील वीज बील, पाणी किंवा गॅस बिल (गेल्या तीन महिन्यातील)  बँक किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक, भाडेकरार


कागदपत्रं कशी अपडेट करायची आणि कोणत्या फॉरमॅटमध्ये असावीत? 

कागदपत्रं ऑनलाईन पद्धतीनं अपलोड करावी लागतील, माय आधार पोर्टल किंवा आधार केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून अपडेट करावं लागेल. 

जेपीईजी, पीएनजी आणि पीडीएफ या प्रकारात फाईल अपलोड करता येतील. याची साईज 2 एमबी पेक्षा कमी असावी. 

फोटो, बोटांचे ठसे यासह इतर बायोमेट्रिक अपडेसाठी आधार नोंदणी केंद्राला भेट द्या. 

14 जूननंतर सर्व प्रकारच्या कागदपत्रांच्या अपडेटसाठी ऑफलाईन पद्धतीनं आधार नोंदणी केंद्रावरुन ती कामं करावी लागतील. यासाठी शुल्क आकारलं जाईल. त्यापूर्वी आधार कार्ड संदर्भातील डिटेल्स अपडेट करुन घ्याव्यात. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget