(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market : शेअर बाजारात आजही अस्थिरता? घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, निफ्टी 16300 अंकावर
Share Market : शेअर बाजाराची आज सपाट सुरूवात झाली. बाजारात व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा घसरण झाली. त्यानंतर बाजार सावरला.
Share Market : शेअर बाजारात आजही अस्थिरता राहण्याचे संकेत दिसत आहे. शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर घसरण दिसून आली. मात्र, त्यानंतर काही वेळेतच बाजार सावरला. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक किंचित वधारला होता.
एनएसई निर्देशांक निफ्टीमध्ये 53 अंकांची घसरण होऊन 16248.90 अंकाची घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकात 161.36 अंकाची 0.30 टक्क्यांची घसरण झाली. सेन्सेक्स 54309.31 अंकावर व्यवहार करत आहे.
आज सकाळी बाजार वधारला होता, त्यावेळी निफ्टी 50 मधील 31 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, उर्वरित 19 शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टीदेखील वधारला होता. बँक निफ्टीत 37.20 अंकाची तेजी दिसून आली. बँक निफ्टी 34312 अंकावर व्यवहार करत आहे.
आज शेअर बाजारात अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 1.88 टक्क्यांची तेजी दिसून आली. भारती एअरटेलमध्ये 1.76 टक्के आणि एचयूएलमध्ये 1.70 टक्क्यांची तेजी दिसून आली. आयशर मोटर्समध्ये 1.61 टक्के आणि एशियन पेंट्समध्ये 1.42 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
ओएनजीसीच्या शेअर दरात 4.6 टक्के आणि टाटा स्टीलमध्ये 2.28 टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. हिंदाल्कोमध्ये 2.22 टक्के आणि जेएसडब्लू स्टील 1.96 टक्क्यांनी घसरले आहेत. कोल इंडियामध्येदेखील 1.96 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
दरम्यान, सोमवारी, शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 364 अंकांनी घसरला तर निफ्टीही 109 अंकांनी घसरला. सेन्सेक्समध्ये 0.67 टक्क्यांची घसरण होऊन तो 54,470 वर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 0.67 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,301 वर बंद झाला. सोमवारी 1036 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 2353 शेअर्समध्ये घसरण झाली. 140 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Explained: डॉलरच्या तुलनेत रुपयाने का गाठला ऐतिहासिक निचांकी दर?
- LIC IPO यशस्वी, 'आत्मनिर्भर भारता'ची ताकद दिसली: DIPAM सचिव