(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Updates : शेअर बाजारात विक्रीचे संकेत, सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला
Share Market Updates : शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्समध्ये 200 अंकांची घसरण झाली.
Share Market Updates : शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. आंतरराष्ट्रीय आणि आशियाई शेअर बाजारात संमिश्र ट्रेंड दिसून आला. भारतीय शेअर बाजारात आजही विक्री सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे.
बाजाराची सुरुवात कशी?
आज शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स फक्त 5 अंकांनी वधारला. निफ्टी 3 अंकानी वधारत 17,120 अंकावर सुरू झाला. त्यानंतर मात्र, घसरण सुरू झाली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 189 अंकांनी तर निफ्टी 51 अंकांनी घसरला.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजार
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजार फारशी हालचाल दिसली नाही. सेन्सेक्स 5 अंकांनी वधारत 57,297 अंकांवर सुरू झाला. निफ्टी 2.80 अंकांनी वधारला.
कोणत्या क्षेत्रात खरेदी-विक्रीचा जोर
आज आयटी, मीडिया, मेटल, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरशिवाय इतर क्षेत्रात विक्रीचा सपाटा सुरू आहे. टाटा स्टील 1.7 टक्क्यांनी वधारला आहे. तर, बीपीसीएल 1.61 टक्के, हिंदाल्को 1.57 टक्क्यांच्या वाढीसह वधारला आहे.
एचयूएल 2.34 टक्के, एशियन पेंट्स 1.68 टक्के, नेस्लेमध्ये 1.6 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
सोमवारी शेअर बाजार कसा होता?
सोमवारी, शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काहीसं आशादायक चित्र असताना पुन्हा अस्थिरता दिसून आली. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 561 अंकांनी तर, निफ्टी 168 अंकानी घसरला. सेन्सेक्समध्ये 0.97 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,302 वर पोहोचला. निफ्टीमध्ये 0.97 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,118 वर पोहोचला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- FPO: रुची सोयाची पब्लिक ऑफर, कमाईची मोठी संधी! बाबा रामदेवांनी जाहीर केली तारीख
- Post Office Investment : बँकेतील एफडीपेक्षा पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळतोय चांगला परतावा, जाणून घ्या इतर फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha