शेअर बाजारावर 'हे' सात पेनी स्टॉक्स सुस्साट धावणार, मिळू शकतो दमदार परतावा!
पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करमे जिकरीचे म्हटले जाते. पण योग्य अभ्यास करून पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.
मुंबई : Top 7 Penny Stocks : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मुंबईत मतदान असल्यामुळे सोमवारी शेअर बाजार बंद होता. दरम्यान, आज मंगळवारी शेअर बाजारात पेनी स्टॉकच्या माध्यमातून चांगली कमाई करता येऊ शकता. सध्या सात पेनी स्टॉक्सची विशेष चर्चा होत आहे. कारण या स्टॉक्सने गेल्या काही काळात चांगले रिटर्न्स दिले आहेत.
या कंपन्यांच्या शेअर्सवर ठेवा विशेष नजर
Future Consumer: गेल्या आठवड्यात शुक्रवारी फ्यूचर कंझ्यूमर या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी आल्याचे पाहायला मिळाले. ही वाढ तब्बल पाच टक्के होती. 1996 साली या कंपनीची स्थापना झालेली आहे. या कंपनीकडून सोअर्सिंग, मॅन्यूफॅक्चरिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग तसेच एफएमसीजी, फूड अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट यांचे वितरण आदी क्षेत्रात ही कंपनी काम करते.
Sampann Utpadan India: संपन्न उत्पादन इंडिया या कंपनीच्या शेअरकडे शुक्रवारी गुंतवणूकदार आकर्षित झालेह होते. हा शेअर शुक्रवारी पाच ट्कक्यांनी अपर सर्कीटवर जाऊन पोहोचला होता. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 26.85 रुपयांवर पोहोचले होते. संपन्न उत्पादन लिमिटेड ही कंपनी रबर आणि पावर प्रोडक्शन या क्षेत्रात काम करते.
Shrenik : श्रेनिक या कंपनीच्या शेअरनेही शुक्रवारी चांगली कामगिरी केली होती. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरला पाच टक्क्यांनी अपर सर्किट लागले. 2012 साली या कंपनीची स्थापना झाली होती. ही कंपनी पेपर, पल्प या क्षेत्रात काम करते.
या चार पेनी स्टॉक्सवरही ठेवा नजर
Hybrid Financial Services या कंपनीचा शेअर शुक्रवारी 10.50 रुपयांवर पोहोचला. या कंपनीच्या शेअरमध्येही 5.00 टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली.
Radaan Mediaworks India या कंपनीचा शेअर 2.20 रुपयांवर पोहोचला होता. या शेअरमध्य शुक्रवार 4.76 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
Supreme Engineering या कंपनीचा भाव शुक्रवारी 1.25 रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्येही 4.17 टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली.
दरम्यानस सोमवारी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानामुळे भारतीय शेअर बाजार बंद होता. तर गेल्या शनिवारी स्पेशल ट्रेडिंग सेशन आयोजित करण्यात आले होते. शनिवारी बीएसई 43 अंकांच्या मजबुतीसह 73960 अंकांवर तर निफ्टी 36 अंकांनी वधारून 22502 अंकांवर पोहोचला होता. शनिवारी बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.77 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. तर निफ्टी फार्मा 0.67 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात काय होणार? नरेंद्र मोदींचं मोठं भाकित; म्हणाले 4 जूननंतर...
पाच हजारांचे ईएमआय प्रकरण, आता द्यावा लागणार 20 पट दंड; 'या' बँकेला मोठा फटका!
पैसे बुडण्याची भीती नाही, दमदार रिटर्न्स मिळणार; जाणून घ्या सरकारच्या 'या' चार भन्नाट योजना!