Anil Ambani : अनिल अंबानींसाठी गुड न्यूज, हायकोर्टानं दिलासा देताच रिलायन्स पॉवरला अच्छे दिन, सलग दोन दिवस अप्पर सर्किट
Anil Ambani: सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं घातलेली बंदी आणि जाहीर नोटीसनंतर रिलायन्स पॉवरनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.
मुंबई :उद्योगपती अनिल अंबानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली हायकोर्टानं सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं रिलायन्स पावरवर घातलेल्या बंदीला आणि जाहीर नोटीसला स्थगिती दिली आहे. यानंतर रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला रिलायन्स पॉवरनं जाहीर केलं होतं की त्यांना सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं एक नोटीस पाठवली होती. एसईसीआयच्या नोटीसनंतर रिलायन्स पॉवर आणि त्यांच्या सहायक कंपन्यांवर भविष्यकाळातील सर्व टेडर्समध्ये सहभागी होण्यावर तीन वर्षांची घालण्यात आली होती. आता मात्र दिल्ली हायकोर्टानं अनिल अंबानींना दिलासा दिला आहे.
सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून घालण्यात आलेली बंदी आणि जाहीर नोटीसनंतर रिलायन्स पॉवरन दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. अनिल अंबानींकडून SECI च्या नोटीसला आणि निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. 26 नोव्हेंबर 2024 ला दिल्ली हायकोर्टानं एसईसीआयच्या नोटीसला आणि निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. मंगळवारी रिलायन्स पॉवरच्या शेअरला 5 टक्के अप्पर सर्किट लागलं होतं. आज देखील रिलायन्स पॉवरच्या शेअरला 5 टक्के अप्पर सर्किट लागलं आहे.
रिलायन्स पॉवरच्या शेअरची किंमत 3 ऑक्टोबर 202 ला 53.64 रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये घसरण होत असल्याचं चित्र होतं. आज मार्केट बंद झालं तेव्हा रिलायन्स पॉवरचा शेअर 38 रुपयांवर होता. रिलायन्स पॉवरची मार्केट कॅप 15377 कोटी आहे. शेअरचा आरओसीई 4.43 टक्के, आरओई -17.5 टक्के आहे. दर्शनी किंमत 10 रुपये असून बुक वॅल्यू Eus.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)