Share Market Opening 28 April : शेअर बाजारासाठी हा आठवडा दमदार, विप्रोसह आयटी क्षेत्रातील शेअर मजबूत स्थितीत
शेअर बाजारासाठी हा आठवडा दमदार ठरला आहे. तसेच भारतीय शेअर बाजाराला चांगले जागतिक समर्थन देखील मिळाले आहे.
Share Market Opening 28 April : शेअर बाजारात (Share Market) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा चांगली वाढ पाहायला मिळाली आहे. जागतिक बाजारात सुरु असलेल्या सकारात्मक वाढीचा फायदा भारतीय शेअर बाजाराला सुद्धा झाला आहे. शेअर बाजाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी विप्रो, टीसीएस, इन्फोसिस यांसारख्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी चांगली सुरुवात केली. तसेच निफ्टी (Nifty) आणि सेन्सेक्स (Sensex) सुद्धा चांगल्या अंकांनी वधारला आहे.
आठवड्याच्या सुरुवातीपासून सकारात्मक वाढ
आठवड्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय शेअर बाजारातून सकारात्मक प्रतिसाद आला होता. सिंगापूर शेअर मार्केटचा निर्देशांक एसजीएक्स निफ्टी (SGX Nifty) मजबूत स्थितीत होता. त्यामुळए भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगली होईल, असं म्हटलं जात होतं. त्यामुळे प्रीओपन सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय शेअर बाजारात तेजी दिसली होती आणि तोच ट्रेण्ड आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कायम आहे. सध्या जगभरात सुरु असलेल्या आर्थिक समस्या पाहता हा आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी चांगला ठरल्याचं पाहायला मिळत आहे.
आजची शेअर बाजाराची सुरुवात
निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही प्रमुख निर्देशांकात सुरुवातीला तेजी दिसून आली. सकाळी 9.15 मिनिटांनी शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात झाली. सेन्सेक्समध्ये 50 अंकांची वाढ होत 60,700 अंकांवर पोहोचला. पण काहीच वेळात सेन्सेक्समध्ये घसरण होऊन 60.630 अंकावर आला. तसेच निफ्टीमध्ये देखील चढउतार पाहायला मिळत होते. निफ्टी आज मर्यादित कक्षेत 17,900 अंकांवर कामकाज करत आहे. दरम्यान आजच्या व्यवहारात बाजारात उलथापालथ होण्याची शक्यता फार नाही.
जागतिक बाजारातून सकारात्मक प्रतिसाद
जगात मंदीचे सावट आल्यानंतर शेअर बाजारात बरेच चढउतार पाहायला मिळाले. गुरुवारी (27 एप्रिल) अमेरिकेच्या शेअर बाजारात तेजीचं वातावरण पाहायला मिळालं. तर आशियाई बाजारात आज तेजीचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. आज जपानचा इंडेक्स निक्कीमध्ये 0.54 अंकांनी तर हाँगकाँगच्या हँगसेंगमध्ये 0.68 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सची स्थिती काय?
आज सुरुवातीच्या व्यवहारात मोठ्या कंपनींच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. सुरुवातीला आयटी क्षेत्रातील कंपन्यामुळे बाजाराला चांगले समर्थन मिळाले. विप्रोच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3 टक्क्यांची वाढ झाली. टीसीएस आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मजबूत स्थितीत आहेत. तर दुसरीकडे बजाजच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.50 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
तसंच हा आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी अतिशय चांगला ठरला आहे. सगल चौथ्या दिवशी शेअर बाजार मजबूत स्थितीत होता. गुरुवारी व्यवहार संपताना सेन्सेक्स 3350 अंकांच्या वाढीसह बंद झाला. आठवड्यातील प्रत्येक सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले.
हेही वाचा
Petrol Diesel Price Today: देशात सर्वात स्वस्त, महाग पेट्रोल-डिझेल कुठे मिळतंय? पाहा आजचे दर