एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Share Market : शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्ससह निफ्टीची उसळी; सेन्सेक्स 60700 पार तर निफ्टी 18 हजारांवर

Share Market Opening Bell : आज शेअर बाजारात किंचित तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्ससह निफ्टी हळूहळू वेग पकडताना दिसत आहे.

Share Market Opening Bell : आज शेअर बाजारात (Stock Market) किंचित उसळीसह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स (Sensex) 60700 पार, तर निफ्टी (Nifty) 18 हजारांवर पोहोचला आहे. भारतीय बाजारावर जागतिक बाजाराचा काही खास परिणाम दिसत नाहीय. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेल्या अस्थिरतेला मंगळवारी बाजार बंद होताना लगाम लागला. मंगळवारी बाजार बंद होताना सकारात्मक चित्र दिसून आलं. परिणामी आज सुरुवातीच्या सत्रात बाजार तेजीसह उघडला.  

शेअर बाजारात किंचित वाढीसह सुरुवात

आज शेअर बाजारात BSE सेन्सेक्स 60.31 अंकांच्या वाढीसह 60,716 वर उघडला आहे. तर, NSE चा निफ्टी 21 अंकांच्या किंचित वाढ म्हणजेच 0.12 टक्क्यांनी 18,074 वर उघडला. आज बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे.

शेअर बाजारातील सध्याची स्थिती

सध्या शेअर बाजार हळूहळू तेजीत येत आहेत. सेन्सेक्स सध्या 211.52 अंकांनी म्हणजेच 0.35 टक्क्यांनी वाढून 60867.24 वर पोहोचला आहे. निफ्टी 58 अंकांनी म्हणजेच 0.32 टक्क्यांनी वाढून 18111.30 वर पोहोचला आहे.

आज कमाई करणारे शेअर्स

आज वाढत्या शेअर्समध्ये बँकांचे शेअर्स आहेत. आज सुरुवातीच्या सत्रात टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये 1.80 टक्क्यांनी आणि एचडीएफसी बँक 1.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विप्रोमध्ये 1.16 टक्के आणि एचसीएल टेक 0.92 टक्क्यांनी उसळी घेतवी आहे. कोटक महिंद्रा बँक 0.88 टक्क्यांनी आणि एचडीएफसी 0.73 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. याशिवाय बजाज फायनान्स, टायटन, आयटीसी, सन फार्मा, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रीड, टेक महिंद्रा आणि ॲक्सिस बँक या शेअर्समध्येही वाढ दिसून येत आहे.

शेअर बाजार तज्ज्ञ काय सांगतात? 

शेअर इंडियाचे व्हीपी डॉ. रवी सिंग यांनी सांगितले की, आज बाजार 18050-18100 च्या आसपास उघडल्यानंतर, दिवसभर व्यवहारात 17950-18150 च्या जवळपास राहण्याची अपेक्षा आहे. आज बाजारात तेजीसह व्यवहार होण्याचा अंदाज आहे. आज FMCG, ऊर्जा, रियल्टी, इन्फ्रा या सेक्टरमध्ये नफा होण्याची शक्यता आहे तर, PSU बँक, मीडिया आणि फार्मा या क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Unemployment : 2023 वर्षात 20.8 कोटी जणांच्या नोकऱ्या जाणार, जगभरात नोकरकपातीचं संकट आणखी गडद; धक्कादायक अहवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीलाBharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
Embed widget