एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीचे संकेत; सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकात तेजी

Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारात आजही तेजीचे संकेत दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसून आली.

Share Market Opening Bell:  आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) तेजीचे संकेत दिसत आहेत. आशियाई शेअर बाजारात (Asian Share Market) संमिश्र संकेत दिसून येत आहेत. एसजीएक्स निफ्टीमध्ये (SGX Nifty) तेजी दिसून आली. बँक निफ्टीतही (Bank Nifty) तेजी दिसून येत आहे. आज बाजारात खरेदीचा जोर दिसण्याची शक्यता आहे. 

गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारात सुरुवातीच्या काही तासांमध्ये तेजी दिसून आली होती. त्यानंतर बाजार बंद होताना नफावसुलीचा जोर दिसल्याने बाजारात घसरण झाली. 

आज बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 178.46  अंकांनी वधारत  59,381.36   अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 58.902 अंकांच्या तेजीसह  17,622  अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 275 अंकांच्या तेजीसह 59,477.90 अंकांवर व्यवहार करत होता. तर, 75.55 अंकांच्या तेजीसह 17,639.50 अंकांवर व्यवहार करत होता.  

आज बाजारात आयटी सेक्टर, मीडिया आणि मेटल शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. तर, इतर सेक्टोरियल इंडेक्समध्ये तेजीचे संकेत दिसून येत आहेत.  मिड कॅप इंडेक्समध्ये आज जवळपास 0.3 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. 

सेन्सेक्स निर्देशांकात समावेश असणाऱ्या 30 पैकी 23 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. अॅक्सिस बँकेतजवळपास 6 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय, टायटन, एचयूएल, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय आणि सन फार्मा, महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय, नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, एल अॅण्ड टी, मारूती, विप्रो, आयटीसी, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. 

प्री-ओपनिंगमध्ये बाजाराची स्थिती 

आज शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंग सत्रात तेजी दिसून आली. बीएसईचा निर्देशांक 137 अंकांच्या तेजीसह 59340 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 29 अंकांच्या तेजीसह 17593 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. 

गुरुवारी बाजारात तेजी 

गुरुवारी, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 95 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 51 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.16 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,202 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.30 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,564 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्ये मात्र 273 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 40,099 अंकांवर स्थिरावला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli : मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Ashadhi Ekadashi Wishes Photos : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
PHOTOS : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
Ashadhi Ekadashi Captions : आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
Kim Kardashian : श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari :  विठुरायासाठी खास रेशमी पोशाखShankaracharya Special Report : शंकराचार्यांच्या प्रतिक्रियेवर कुणाचं काय मत?Narayan Survey Special Report : नारायण सुर्वेंचा फोटो पाहताच चोराचा माफीनामाTop 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM : 16 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli : मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Ashadhi Ekadashi Wishes Photos : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
PHOTOS : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
Ashadhi Ekadashi Captions : आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
Kim Kardashian : श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
Kamathipura : कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
पूजा खेडकर यांच्यासारखे लोकं राजकारणातही नसतात; आदित्य ठाकरेंची रोखठोक कमेंट
पूजा खेडकर यांच्यासारखे लोकं राजकारणातही नसतात; आदित्य ठाकरेंची रोखठोक कमेंट
Embed widget