Share Market Updates : शेअर बाजारात विक्रीचा दबाव, सेन्सेक्स 250 अंकांनी घसरला
Share Market Updates : शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आजच्या घसरणीसह सुरू झाली. जागतिक शेअर बाजारात पडझड झाली आहे.
Share Market Updates : आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण (Share Market) झाल्याचे दिसून आले. प्री-ओपनिंग सत्रात शेअर बाजारात घसरण दिसून आली. बाजार सुरू झाल्यानंतर घसरणीत वाढ झाली. जागतिक शेअर बाजारातही पडझड झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.
आज सुरूवातीच्या ट्रेंडमध्ये सेन्सेक्स 233.24 अंकांच्या घसरणीसह 54,248 अंकावर खुला झाला होता. तर, निफ्टी निर्देशांकात 84.45 अंकांची घसरण दिसून आली. सकाळी 9.40 वाजता सेन्सेक्स 373 अंकांच्या घसरणी 54,108.61 अंकावर ट्रेड करत होता. तर, निफ्टी 91.80 अंकांच्या घसरणीसह 16,128.80 अंकावर ट्रेड करत होता.
निफ्टी 50 मधील 22 शेअरमध्ये तेजी दिसत असून 28 शेअरमध्ये घसरण दिसत आहे. त्याशिवाय, बँक निफ्टीतही खरेदीचा जोर दिसत आहे. बँक निफ्टीत 158.40 अंकांच्या तेजीसह 35282 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत.
निफ्टी बँक, निफ्टी ऑटोमध्ये तेजी दिसत आहे. एफएमसीजी, वित्तीय सेवा, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, ऑइल अॅण्ड सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसत आहे. तर, आयटी, माीडिया, मेटल, फार्मा आणि रियल्टीच्या शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे.
महिंद्रा अॅण्ड महिंद्रामध्ये 1.40 टक्के, एनटीपीसीमध्ये 1.32 टक्के, ओएनजीसीमध्ये 0.32 टक्क्यांची तेजी दिसत आहे.
भारती एअरटेलमध्ये 4.02 टक्के, टीसीएसमध्ये 3.90 टक्के, टेक महिंद्रामध्ये 2.83 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. विप्रोमध्ये 2.48 टक्के, एचसीएल टेकमध्ये 2.35 टक्क्यांची घसरण झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरातील व्यवहार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 300 अंकांनी वधारून 54481 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी निर्देशांकात 87 अंकांनी वधारत 16220 अंकांवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स 1500 अंकांनी वधारला होता. निफ्टी 50 मधील 32 शेअर वधारले होते. तर, 18 शेअरमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअरमध्ये तेजी होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या: