(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Updates : शेअर बाजारात आजही अस्थिरता? वधारल्यानंतर सेन्सेक्समध्ये घसरण
Share Market Updates : शेअर बाजारात आज पुन्हा अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीला वधारल्यानंतर सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली.
Share Market Updates : शेअर बाजारात आजही अस्थिरता राहण्याचे संकेत मिळत आहेत. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर वधारला होता. मात्र, काही वेळेत विक्रीचा दबाव वाढल्याने सेन्सेक्स निर्देशांकात घसरण झाल्याचे दिसून आले. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स वधारल्याने 53 हजार अंकांची पातळी ओलांडली होती. मात्र, घसरणीनंतर सेनसेक्स निर्देशांक पुन्हा 53 हजारांखाली आला.
आज शेअर बाजारात सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 56.26 अंकांच्या घसरणीसह 52851.67 च्या पातळीवर सुरू झाला. त्याशिवाय एनएसई निर्देशांक निफ्टी 42 अंकांच्या घसरणीसह 15710 अंकांच्या पातळीवर सुरू झाला. त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने बाजार वधारला. मात्र, काही वेळेत पुन्हा विक्रीचा दबाव वाढल्याने बाजारात घसरण दिसून आली. सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 156 अंकांच्या घसरणीसह 52,751.52 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टीत 59 अंकांच्या घसरणीसह 15,693.05 अंकांवर व्यवहार करत होता.
सकाळच्या सत्रात निफ्टीतील 22 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 28 शेअर घसरले. बँक निफ्टीत तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टी सुरुवातीला 140.75 अंकांनी वधारला होता. बँक निफ्टी 33,680.20 च्या पातळीवर व्यवहार करत होते. बँक निफ्टीतील सर्व 12 शेअरमध्ये तेजी दिसून आली.
आज ऑटो, मेटल, फार्मा आणि ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअर दरात घसरण दिसून येत आहे. मेटलमध्ये 1.62 टक्के आणि आयटीमध्ये 0.75 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. त्याशिवाय एफएमसीजी शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, हिंदाल्कोच्या शेअरमध्ये 2.43 टक्क्यांची घसरण दिसून आली. जेएसडब्लू स्टीलच्या शेअर दरात 1.85 टक्के, टाटा स्टीलच्या शेअरमध्ये 1.78 टक्के आणि टीसीएसमध्ये 1.48 टक्क्यांची घसरण झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: