एक्स्प्लोर

सप्टेंबरपूर्वी केंद्र सरकार करणार हे मोठे काम, रोजगाराला मिळणार चालना

New Foreign Trade Policy: परकीय व्यापार धोरणाबाबत केंद्र सरकार योजना बनवत आहे. वाणिज्य मंत्रालय या वर्षी सप्टेंबरपूर्वी नवीन पाच वर्षांचे विदेशी व्यापार धोरण (FTP) आणण्याची तयारी करत आहे.

New Foreign Trade Policy: परकीय व्यापार धोरणाबाबत केंद्र सरकार योजना बनवत आहे. वाणिज्य मंत्रालय या वर्षी सप्टेंबरपूर्वी नवीन पाच वर्षांचे विदेशी व्यापार धोरण (FTP) आणण्याची तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला निर्यात केंद्रात रूपांतरित करण्याची योजना देखील या दस्तऐवजाचा भाग असेल. ही माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, FTP चा उद्देश निर्यात प्रोत्साहन आणि रोजगार निर्मिती हा असेल.

सुरुवातीला 50 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल

वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत परकीय व्यापार महासंचालनालय (DGFT) हे धोरण तयार करत आहे. या योजनेसाठी निधी वाटपासाठी ते लवकरच हा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवणार आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, या योजनेअंतर्गत सुरुवातीला अशा 50 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल, ज्यांची उत्पादने पुढे नेली जाऊ शकतात आणि ज्यांच्याकडे निर्यातीची प्रचंड क्षमता आहे.

देशात 750 जिल्हे 

डीजीएफटी स्पर्धेद्वारे या जिल्ह्यांची निवड करते. अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या राज्यांना आणि जिल्ह्यांना या योजनेंतर्गत आर्थिक प्रोत्साहन मिळवायचे आहे, त्यांना त्यासाठी स्पर्धा करावी लागेल. सध्या देशात 750 जिल्हे आहेत.

कोणत्या योजनांचा समावेश असेल?

राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये ही एक प्रकारची स्पर्धा असेल. यासाठी आम्ही तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे घेऊन येऊ, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. ही योजना FTP मध्ये देखील समाविष्ट केली जाईल. ही केंद्र पुरस्कृत योजना असेल. त्याचा 60 टक्के भार केंद्र उचलणार असून उर्वरित राज्यांना उचलावा लागणार आहे. सप्टेंबरपूर्वी एफटीपी जारी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असल्याचं या अधिकाऱ्याने सांगितले.

वाणिज्य मंत्रालयाच्या दस्तऐवजानुसार, निर्यात प्रोत्साहन उपक्रमांमध्ये राज्यांना सक्रियपणे रस दाखवावा लागेल. त्यांच्या सहभागाशिवाय निर्यात वाढणार नाही. जिल्ह्यांचे निर्यात केंद्रात रूपांतर करण्याच्या योजनेचा उद्देश निर्यात आणि उत्पादनाला चालना देणे आणि तळागाळात रोजगार निर्मिती करणे हे आहे. सध्याचे परकीय व्यापार धोरण (2015-20) सप्टेंबर 2022 पर्यंत लागू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Embed widget