Loan Update: होम लोन आणि कार लोन पेक्षा पर्सनल लोन महागडे का?
Home Loan Update : जेव्हा तुम्ही कार लोन अथवा होम लोन घेता, तेव्हा कोणतं लोन तुम्हाला स्वस्त आणि कोणतं लोन महागडं मिळते?
Home Loan Update : जेव्हा तुम्ही कार लोन अथवा होम लोन घेता, तेव्हा कोणतं लोन तुम्हाला स्वस्त आणि कोणतं लोन महागडं मिळते? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? अनेकजणांनी कोणतं लोन स्वस्त आणि कोणतं महागडं याचा विचार केला नसेल. सर्वात महागडे लोन पर्सनल लोन असते... होय... पर्सनल लोनवर तुम्हाला 10 टक्के ते 24 टक्के पर्यंत व्याज बँकांना द्यावं लागते. तर होम लोनवर तुम्हाला 6.5 टक्के ते 9 टक्के व्याजदर असतो..
... म्हणून पर्सनल लोन महागडे -
पर्सनल लोन सर्वात महागडे असते... त्याचं कारणही तसेच आहे. कारण, पर्सनल लोनचा कालावधी कमी असतो. पर्सनल लोन साधारणपणे एक ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी असते. पर्सनल लोनसाठी कोणताही गॅरंटी मागितली जात नाही. अशात जर एखाद्या व्यक्तीने कोणत्या कारणामुळे लोन न भरल्यास बँकेचं नुकासान होतं. त्यामुळेच पर्सनल लोन महागडे असते.
कार लोन स्वस्त -
जर तुम्ही एखादी कार विकत घेत असाल तर तुम्हाला सरकारला तब्बल 42 टक्के टॅक्स द्यावा लागतो. म्हणजेच, जितक्या अधिक कार विकल्या जातील, तितका सरकारचा फायदा अधिक होतो. तसेच सप्लाई चेन चालवणं आणि रोजगार निर्मिती होत असल्यामुळे देशाची अर्थव्यावस्था वाढण्यासही मदत होते. त्यामुळेच कार लोन सरकारकडूनही प्रमोट केले जाते, जेणेकरुन कार आणि दुचाकींची विक्री झाल्यामुळे सरकारचा फायदा होतो अन् देशाची अर्थव्यवस्था वाढण्यास मदत होते.
होम लोन स्वस्त -
बँकामध्ये होम लोन 6.5 टक्के ते 9 टक्कें व्याज दरात मिळते. त्यामुळे सरकारकडन हे प्रमोटही केले जाते. सर्व बँट आणि NBFC ला होम लोनसाठी नॅशनल हाऊसिंग बँकेकडून (National Housing Bank) लोन पुरवले जाते. नॅशनल हाऊसिंग बँकेकडून बँकांना ते देत असलेल्या व्याजदरांपेक्षा दोन टक्के कमी व्याज दरात लोन देण्यात येते. जेव्हा एखादं घर तयार होते, तेव्हा त्यामध्ये वाळू, विटा, सिमेंट, लोखंड आणि इतर वस्तूंसह मजदूरही लागतात... त्यामुळे रोजगारही उपलब्ध होतो. या सर्व गोष्टींमुळे देशाची अर्थव्यवस्था वाढण्यास मदत होते. त्यामुळे सरकारकडून होम लोनला प्रमोट करण्यात येते.