एक्स्प्लोर
Share Market: शेअर बाजार घसरण्याचा जाणकारांचा अंदाज, जाणून घ्या काय आहेत महत्त्वाची कारणं
राजकीय परिस्थिती आणि वाढत्या महागाईमुळे परदेशी गुंतवणूक येत्या काही महिन्यांत अस्थिर राहू शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
Share Market Experts predict stock market Falls : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 7,500 कोटी रुपये काढले आहेत. जगभरात मंदीची चिन्ह आहेत, अशातच यूएस फेडरल रिझर्व्ह आणि जगभरातील इतर केंद्रीय बँकांकडून चलनविषयक धोरण कडक होण्याची भीती आहे. याच भीतीने गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेत आहेत. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 2022 मध्ये आतापर्यंत 1.76 लाख कोटी रुपये काढले आहेत अशी माहिती डिपॉझिटरी डेटातून मिळाली आहे
राजकीय परिस्थिती आणि वाढत्या महागाईमुळे परदेशी गुंतवणूक येत्या काही महिन्यांत अस्थिर राहू शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर 3 ते 14 ऑक्टोबर दरम्यान विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून 7,458 कोटी रुपये काढले आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांनी शेअर बाजारातून 7,600 कोटींहून अधिक रक्कम काढली होती.
यापूर्वी,विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये 51,200 कोटी रुपये आणि जुलैमध्ये सुमारे 5,000 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती. तर जुलैपूर्वी परदेशी गुंतवणूकदार गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सलग नऊ महिने निव्वळ विक्री करणारे राहिले आहेत. परंतू यूएस आणि इतर देशांमधील केंद्रीय बँकांद्वारे आर्थिक धोरण कडक करण्याच्या चिंतेमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी बाहेर पडणे पसंत केल्याचे दिसत आहे
डॉलरची ताकद आणखी एक कारण
एफपीआयच्या (FPI) विक्रीचे मुख्य कारण म्हणजे डॉलरमध्ये सातत्याने होणारी वाढ आणि आगामी काळातही डॉलर मजबूत होत राहील, असा अंदाज आहे. विदेशी गुतंवणूकदारांनी केवळ भारतच नाही तर आशियातील इतर अनेक बाजारपेठांपासून दूर राहणे पसंत केलं आहे. यामध्ये फिलीपिन्स, तैवान आणि थायलंड यासारख्या देशांचा समावेश आहे.
गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटी रुपयांचे नुकसान
बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (Bombay Stock Exchange) सूचीबद्ध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांचे गेल्या आठवड्यात 3.92 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) गेल्या आठवड्यात 3 दिवस नकारात्मक निर्देशांकासह बंद झाला होता. त्यात 2 दिवस वाढ झाली होती. मात्र, ही वाढ 30 दिवसांची पडझड भरून काढू शकली नाही. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 0.46 टक्के किंवा 271 अंकांनी घसरला. त्याच वेळी, NSE चा निफ्टी 0.74 अंकांनी किंवा 128 अंकांनी खाली आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement