Share Market : गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात तेजी, Sensex 684 अंकांनी वधारला
Stock Market Updates : आज शेअर बाजारातील बँक, कॅपिटल गुड्स, आरोग्य, आयटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं.
मुंबई : शेअर बाजारात (Share Market Closing Bell) आज तेजी दिसून आल्याने गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 684 अंकांची वाढ झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 171 अंकांची वाढ झाली आहे. सेन्सेक्समध्ये आज 1.20 टक्क्यांची वाढ झाली असून तो 57,919 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 1.01 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,185 अंकावर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही आज 681 अंकांची वाढ होऊन तो 39,305 अंकावर पोहोचला.
आज शेअर बाजार बंद होताना (Share Market Closing Bell) एकूण 1757 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1591 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर 146 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज बाजार बंद होताना Infosys, HDFC Bank, HDFC, UPL and HCL Tech कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर ONGC, M&M, Bajaj Auto, JSW Steel आणि Hindalco Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली.
आज बाजार बंद होताना बँक, कॅपिटल गुड्स, आरोग्य आणि आयटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 0.5 टक्के तर 1.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मेटल, उर्जा आणि रिअॅलिटी क्षेत्रातील शेअर्समध्ये 0.5 ते एक टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे.
शेअर बाजाराची सुरुवात दणक्यात
आज सकाळी बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 58,162.74 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 17,322.30 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 973 अंकांनी वधारत 58,208.43 अंकावर तर, निफ्टी 278 अंकांनी वधारत 17,292.35 अंकांवर व्यवहार करत होता.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- Infosys- 3.83 टक्के
- HDFC Bank- 3.26 टक्के
- HDFC- 2.64 टक्के
- UPL - 2.17 टक्के
- HCL Tech- 2.08 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
- ONGC- 1.73 टक्के
- M&M - 1.43 टक्के
- JSW Steel- 1.25 टक्के
- Hindalco- 1.10 टक्के
- Bajaj Auto - 0.95 टक्के
महत्त्वाची बातमी :