Share Market Closing Bell: तेजीसह शेअर बाजारातील व्यवहार बंद, 'या' स्टॉक्सच्या खरेदीने बाजार सावरला
Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज दिवसभर अस्थिरता राहिल्यानंतर बाजार तेजीसह बंद झाला.
Share Market Closing Bell: दोन दिवसांच्या पडझडीनंतर बुधवारी भारतीय शेअर बाजारात (Share Market Closing Bell) तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर दिसल्याने बाजार वधारला. आज दिवसभरातील व्यवहारात बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. मधल्या काही वेळेत बाजारात घसरण दिसून आली होती. मात्र, दुपारनंतर बाजारात खरेदीचा ओघ वाढला.
आज बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 478 अंकांच्या तेजीसह 57,625 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत (Nifty) 140 अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी 17123 अंकांवर बंद झाला.
आज शेअर बाजारा मीडिया वगळता इतर क्षेत्रात खरेदीचा जोर दिसून आला. आयटी, बँकिंग, ऑटो, फार्मा, एनर्जी, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी आणि ग्राहकोपयोगी वस्तू, एफएमसीजी सारख्या क्षेत्रात खरेदीचा जोर दिसून आला.
स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्येही तेजी दिसून आली. निफ्टी 50 मधील 43 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, सेन्सेक्समधील 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
बाजारात 1681 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. तर, 1760 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 130 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल वाढून 271.67 लाख कोटी रुपयावर पोहचला आहे.
पॉवरग्रीड, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, इंडसइंड बँक, लार्सन, अल्ट्राटेक सिमेंट आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, भारती एअरटेल, टायटनच्या शेअर दरात घसरण झाली होती.
दरम्यान, आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 57,312 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 17,025.55 अंकांवर खुला झाला होता. बाजारात किंचित तेजी दिसून आली.
आशियाई शेअर बाजारात घसरण
आज, आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने 2023 या वर्षासाठी जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 2.7 टक्के इतका केला आहे. आधीच्या अंदाजापेक्षा हा अंदाज कमी आहे. त्याचा परिणाम आशियाई शेअर बाजारावर दिसून आल्याने घसरण झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra GST: केंद्राकडे महाराष्ट्राची 22 हजार कोटींची जीएसटी थकबाकी; विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका
- Recession : सहा ते नऊ महिन्यात जागतिक मंदीची शक्यता : जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांचा इशारा