Share Market Closing Bell : शेअर बाजारात तेजी कायम; सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला, निफ्टीने ओलांडला 17300 चा टप्पा
Share Market Closing Bell : मंगळवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला. आयटी, बँक, फार्मा आदी क्षेत्रात तेजी दिसून आली.
Share Market Closing Bell : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी कायम राहिली. मंगळवारी शेअर बाजार सुरू झाला तेव्हा बाजारात खरेदी होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर व्यवहाराच्या शेवटच्या सत्रात तेजी कायम राहिली. आज शेअर बाजारातील व्यवहार संपले तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारलेले राहिलेत.
आज सेन्सेक्स 350.16 अंकांवर म्हणजे 0.61 टक्क्यांच्या तेजीसह 57,943.65 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी निर्देशांकात 103.30 अंकांनी वधारत 17,325.30 अंकांवर बंद झाला.
आज शेअर बाजारात एचडीएफसीच्या शेअरला सर्वाधिक मागणी होती. एचडीएफसीचा स्टॉक टॉप गेनर राहिला. त्याशिवाय, भारती एअरटेल, अल्ट्रा केमिकल, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डी, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, एचयूएल, एचसीएल टेक, विप्रो, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, एलटी, अॅक्सिस बँक, टायटन आदी शेअर वधारले होते.
आज सकाळी बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक 221.27 अंकांनी वधारत 57,814 अंकांवर सुरू झाला. निफ्टी 75.20 अंकांनी वधारला. निफ्टी 17,297 वर सुरू झाला. सेन्सेक्सचा 57900 अंकाचा टप्पा ओलांडला. त्यानंतर काही वेळ नफा वसुली दिसून आली. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 236 अंकांनी वधारला होता. सेन्सेक्स 57,825.90 अंकांवर ट्रेंड करत होता. तर, निफ्टी 65 अंकांनी वधारत 17,288.20 अंकांवर ट्रेंड करत होता.
घसरणारे शेअर्स
निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी, मीडिया, पीएसयू बँक आणि ऑइल अॅण्ड गॅस सेक्टर या निर्देशांकात घसरण झाली.
वधारणारे शेअर्स
निफ्टी बँक, वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे स्टॉक्स, आयटी, मेटल, फार्मा, खासगी बँका, रिअल इस्टेट, हेल्थकेअर आणि ग्राहकोपयोगी वस्तू आदी सेक्टर वधारले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! PM किसान सन्मान निधीसाठी सरकारने e-KYCची मुदत वाढवली, ही आहे शेवटची तारीख
- PAN Aadhaar Link : 'या' व्यक्तींना पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक नाही, जाणून घ्या काय आहे कारण?
- LIC जीवन सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करा, निवृत्तीनंतर दरमहा मिळवा 'इतकी' पेन्शन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha