Share Market Closing Bell: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी विक्रीचा जोर; सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण
Share Market Closing Bell: आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. या विक्रीमुळे निफ्टी 16500 अंकांच्या पातळीखाली गेला आहे.
Share Market Closing Bell: मागील आठवड्यात तेजीत असलेल्या शेअर बाजारात (Share Market Closing Bell) पुन्हा घसरण सुरू झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. सेन्सेक्स (Sensex) निर्देशांकात 497.73 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. तर, निफ्टी (Nifty) निर्देशांकात 147.20 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 55,268.49 अंकांवर आणि निफ्टी 16,483.80 अंकांवर बंद झाला.
आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा 1119 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ नोंदवण्यात आली. तर, 2128 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. उर्वरित 138 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
इन्फोसिस, एचयूएल, अॅक्सिस बँक, डॉ. रेड्डी लॅब, बजाज ऑटो या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. तर, बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्लू स्टील, ग्रासीम इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि कोल इंडिया या कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली.
सेन्सेक्समधील 30 टॉप कंपन्यांपैकी 10 स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. तर, 20 शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. बजाज फिनसर्व्ह शेअर दरात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, भारती एअरटेल, पॉवर ग्रीड, बजाज फायनान्स, आयटीसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एशियन पेंट्स आणि रिलायन्सच्या शेअर दरात खरेदीचा जोर दिसून आला.
निफ्टीमध्ये फक्त मीडिया सेक्टरमध्ये खरेदी दिसून आली. तर, इतर सेक्टरमध्ये विक्रीमुळे घसरण झाली. निफ्टी बँक, ऑटो, वित्तीय सेवा, एफएमसीजी, आयटी, मेटल, फार्मा, पीएसयू बँक, खासगी बँक, रियल्टी हेल्थ केअर, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्येही घसरण नोंदवण्यात आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Recession: जगातील इतर देशांप्रमाणे भारतावरही मंदीचे सावट? जाणून घ्या
- RBI Office Attendant : रिझर्व्ह बँकेकडून 4 बँकांवर निर्बंध; लातूरच्या 'या' बँकेचाही समावेश, पैसे काढण्यावरही मर्यादा
- रुपयात आणखी घसरण शक्य, देशांतर्गत चलन 82 च्या पातळीवर जाण्याची शक्यता, अर्थतज्ज्ञांचा अंदाज