एक्स्प्लोर

206 कोटींच्या महत्त्वाच्या आयपीओला ब्रेक, अनेक तक्रारी आल्यानंतर सेबीचा निर्णय!

नोव्हेंबर महिन्यात अनेक आयपीओ आले आहेत. यातील काही आयपीओंनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. तर काही आयपीओंनी निराशा केली आहे. असे असतानाच सेबीने एक आयपीओ तात्पुरता थांबवला आहे.

Rosmerta Digital Services IPO: स्मॉल मीडियम इंटरप्राइज (SME) श्रेणीतील आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या आयपीओला (IPO) आता ब्रेक लागला आहे. या आयपीओचे नाव रोसमेरटा डिजिटल सर्व्हिसेस असे असून सेबीनेच या आयपीओला तात्पुरते थांबवले आहे. याआधीच्या तारखांनुसार 18 नोव्हेंबर रोजी येणार होता. मात्र आता कंपनीविरोधात सेबीकडे अनेक तक्रारी गेल्यामुले हा आयपीओ थांबवण्यात आला आहे. दरम्यान, सध्या भांडवली बाजाराची खराब स्थिती लक्षात घेऊन आम्ही हा आयपीओ सध्याच न आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण  रोसमेरटा डिजिटल या कंपनीने दिले आहे. 

18 नोव्हेंबर रोजी येणार होता आयपीओ 

 रोसमेरटा डिजिटल ही कंपी आयपीओच्या माध्यमातून एकूण 206 कोटी रुपये उभे करणार होती. हा आयपीओ येत्या 18 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार होता. 21 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना या आयपीओत गुंतवणूक करता येणार होती. कंपनीने आयपीओचा किंमत पट्टा 140-147 रुपये प्रति शेअर असा ठेवला होता. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 140.36 लाख नवे शेअर्स जारी करणार होती. या आयपीओत OFS शेअर्स नसतील. ही कंपनी बीएसई एसएमई वर लिस्ट होणार आहे. रोसमेरटा डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड (Rosmerta Digital Services) ही कंपनी रोसमेरटा टेक्नोलॉजीज लिमिटेड (आरटीएल) या कंपनीची उपकंपनी आहे.

Rosmerta Digital Services IPO: रोसमेरटा कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे? 

रोसमेरटा डिजिटलच्या  रेड हेरिंग प्रॉसपेक्ट्सनुसार (RHP) या कंपनीचा महसूल 183 टक्क्यांनी वाढला आहे. तर वित्त वर्ष 2023-24 चा निव्वळ नफा 553 टक्क्यांनी वाढलेला आहे. आयपीओच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम ही कंपनी मुंबईत ऑफिस खरेदी करण्यासाठी वापरणार आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत गोदाम. अनुभव केंद्र स्थापन करण्यासाठी हा पैसा वापरला जाणार आहे.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

'या' पाच स्टॉक्सचा शेअर बाजारात धमाका! भविष्यात देणार 35 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स!

SIP : अवघे 1000 रुपये गुंतवा अन् व्हा करोडपती, जाणून घ्या गुंतवणुकीचा 12-30-12 फॉर्म्युला आहे तरी काये?

Share Market Holiday : मोठी बातमी! सलग 3 दिवस शेअर बाजार राहणार बंद, लाँग विकएंडचं नेमकं कारण काय?

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget