गणेशचतुर्थी ते इद ए मिलाद; सप्टेंबरमध्ये तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद, राज्यानुसार तपासा यादी
September Bank Holidays: सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ईद ए मिलाद यासह ओणम सणही राहणार आहे. या महत्वाच्या सणांदिवशी कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये सुट्टी राहणार हे जाणून घ्या
![गणेशचतुर्थी ते इद ए मिलाद; सप्टेंबरमध्ये तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद, राज्यानुसार तपासा यादी September Bank Holiday Ganeshchaturthi to Eid e Milad Banks will be close on this dates check statewise list गणेशचतुर्थी ते इद ए मिलाद; सप्टेंबरमध्ये तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद, राज्यानुसार तपासा यादी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/6d9fc7951ffae1790524155f007089c017249364606871063_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
September Bank Holidays: राज्यात आता गणेशोत्सोवासह अनेक सणसमारंभ जवळ आले आहेत. ऑगस्ट महिना आता संपत आला आहे. त्यामुळे आपल्या बँकेच्या कामांचं योग्य नियोजन करा कारण सप्टेंबर महिन्यात १५ दिवस बँकांना सुटी राहणार आहे. त्यामुळे बँकेच्या सुट्टीच्या दिवशी नेमकं तुमचं कामाचं नियोजन यायला नको. सप्टेंबर महिन्यात यंदा विविध राज्यांमध्ये तब्बल १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये दुसरा आणि चौथ्या शनिवारसह रविवारचाही समावेश आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी बँकेला सुट्ट्या कधी राहणार याची महिन्याची यादी जाहीर करत असते. यानुसार गणेशचतुर्थी ते इदमिलादपर्यंत विविध राज्यांमध्ये बँकांना सुटी राहणार आहे. पहा कोणत्या दिवशी सुटी, कोणत्या दिवशी शनिवार रविवार आलाय जोडून? जाणून घ्या
देशभरात बँकांना कधी राहणार सुट्टी?
सप्टेंबरच्या पहिल्या दिवसाची सुरुवातच रविवारी होत असल्याने देशभरातील सर्व बँका १ सप्टेंबरला सुट्टी राहणार आहे. सप्टेंबर महिन्यात यंदा एकूण १५ सुट्ट्या आल्या असून शनिवार, रविवार अशा चार दिवस देशभरातील बँका बंद राहणार आहेत. बाकी राज्यनिहाय, सणासमारंभांनुसार राज्यनिहाय या सुट्ट्या अवलंबून राहणार आहेत.
सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ईद ए मिलाद आणि ओणमही
सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ईद ए मिलाद यासह ओणम सणही राहणार आहे. या महत्वाच्या सणांदिवशी कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये सुट्टी राहणार हेही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सांगितलं आहे. या सुट्ट्यांनुसार बँकेच्या कामांचं योग्य नियोजन केल्यास बँकाची कामं रखडून राहणार नाहीत.
राज्यनिहाय तपासा कधी असतील बँकांना सुट्ट्या
7 सप्टेंबर- रोजी गणेश चतुर्थी असल्याने मुंबई, नागपूर, अहमदाबाद, बंगळूरु, भुवनेश्वर, हैद्राबाद, पणजी या शहरांमध्ये बँकांना सुट्टी राहणार आहे.
8 सप्टेंबर- रोजी रविवार असल्यानं देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
14 सप्टेंबर- दुसरा शनिवार आणि ओणम असल्याने याही दिवशी देशभरातील बँका बंद असतील.
15 सप्टेंबर- रविवार असल्याने देशभर बँकांना सुट्टी
16 सप्टेंबर- बाराफवात इद ए मिला असल्याने गुजरात, मिझोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, जम्मू, केरळ, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंडमध्ये ईद-ए मिला- बँका बंद आहेत.
17 सप्टेंबर- इंद्रजात्रा/ईद-ए-मिलाद (मिलाद-उन-नबी) - सिक्कीम, छत्तीसगडमध्ये बँका बंद आहेत.
18 सप्टेंबर (बुधवार) - सिक्कीममध्ये पांग-लबसोल- बँका बंद आहेत.
20 सप्टेंबर (शुक्रवार) शुक्रवारी ईद-ए-मिलाद-उल-नबी- जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद.
21 सप्टेंबर (शनिवार)- श्री नारायण गुरु समाधी दिन- केरळमध्ये बँका बंद आहेत.
23 सप्टेंबर (सोमवार) - महाराजा हरिसिंह जी यांच्या जयंती- जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद आहेत.
तुम्हाला या सुट्ट्यांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आरबीआयच्या https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. या सुट्ट्यांच्या दिवशी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बँकिंगचे व्यवहार करू शकता. यूपीआय, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंगच्या सेवा चालूच असतील.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)