एक्स्प्लोर

Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानींवर सेबीचा सर्जिकल स्ट्राईक; 5 वर्ष शेअर बाजारमध्ये बंदी, 25 कोटींचा दंड ठोठावला

SEBI ने जारी केलेल्या आदेशानुसार, अनिल अंबानी यांनी RHFL अधिकाऱ्यांच्या मदतीने पैशांची उधळपट्टी केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांनी स्वत: निधीचा वापर केला, मात्र हा निधी कर्ज म्हणून दिल्याचे भासवले.

Anil Ambani : निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी बाजार नियामक सेबीने उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांना शेअर बाजारातून 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. अंबानींना 25 कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यांना कोणत्याही लिस्टेड कंपनीत संचालक होण्यासही बंदी आहे. त्यांच्या व्यतिरिक्त, रिलायन्स होम फायनान्स (RHFL) च्या माजी प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर 24 संस्थांवर बंदी घालण्यात आली आहे आणि दंड ठोठावण्यात आला. रिलायन्स होम फायनान्सवर 6 महिन्यांची बंदी घालण्यात आली असून 6 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

SEBI ने जारी केलेल्या 222 पानांच्या अंतिम आदेशानुसार, अनिल अंबानी यांनी (Sebi has barred businessman Anil Ambani) RHFL अधिकाऱ्यांच्या मदतीने पैशांची उधळपट्टी केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांनी स्वत: निधीचा वापर केला, मात्र हा निधी कर्ज म्हणून दिल्याचे भासवले.

सेबीच्या आदेशाशी संबंधित काय घडलं?

  • अशी कर्जे बंद करण्याच्या आणि कॉर्पोरेट कर्जाचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना संचालक मंडळाने दिल्या होत्या, परंतु कंपनीच्या व्यवस्थापनाचे दुर्लक्ष
  • SEBI ने म्हटले आहे की, परिस्थिती पाहता, RHFL ला फसवणुकीत गुंतलेल्या व्यक्तींइतकेच जबाबदार धरले जाऊ नये. इतर संस्थांनी निधी वळवण्यास मदत केली.
  • अनिल अंबानी यांना 25 कोटी रुपये, अमित बापना यांना 27 कोटी रुपये, रवींद्र सुधळकर यांना 26 कोटी रुपये आणि पिंकेश आर शहा यांना 21 कोटी रुपयांचा दंड
  • रिलायन्स युनिकॉर्न एंटरप्रायझेस, रिलायन्स एक्सचेंज नेक्स्ट आणि इतर कंपन्यांना निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी प्रत्येकी 25 कोटी रुपयांचा दंड 

रिलायन्स इन्फ्रा शेअर्स जवळपास 14 टक्के घसरले

सेबीच्या बंदीनंतर अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स पॉवर या कंपन्या घसरत आहेत. रिलायन्स इन्फ्रा सर्वात जास्त 14 टक्के, रिलायन्स होम फायनान्स 5.12 टक्के आणि रिलायन्स पॉवर 5.01 टक्के घसरला आहे.

अनिल 1983 मध्ये रिलायन्सशी जोडले गेले, वाटणी होताच व्यवसाय बुडाला

मुकेश अंबानी 1981 मध्ये आणि अनिल अंबानी 1983 मध्ये रिलायन्समध्ये सामील झाले. जुलै 2002 मध्ये धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले. मृत्यूपत्र त्यांनी लिहिलं नव्हतं. मुकेश अंबानी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि अनिल अंबानी व्यवस्थापकीय संचालक झाले.नोव्हेंबर 2004 मध्ये पहिल्यांदाच मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी या भावांमधील भांडण समोर आले. धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी कोकिलाबेन कुटुंबात सुरू असलेल्या वादामुळे नाराज होत्या, त्यानंतर व्यवसायात फूट पडली.

दोघांमध्ये वाटणी जून 2005 मध्ये झाली, पण कोणता भाऊ कोणता कंपनी पाहणार याचा निर्णय 2006 पर्यंत झाला. आयसीआयसीआय बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व्ही के कामत यांना या वाटणीत हस्तक्षेप करावा लागला होता. वाटणीनंतर मुकेश अंबानी यांना पेट्रोकेमिकल्सचा व्यवसाय मिळाला, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन पेट्रोल केमिकल्स कॉर्प लिमिटेड, रिलायन्स पेट्रोलियम, रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. 

धाकटा भाऊ अनिल यांच्या मालकीच्या RCom, Reliance Capital, Reliance Energy, Reliance Natural Resources सारख्या कंपन्या होत्या. मुकेश अंबानी नव्या उंचीला स्पर्श करत आहेत, पण अनिल यांच्या चुकांमुळे त्यांचा व्यवसाय बुडाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special ReportWare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा  : 12 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget