एक्स्प्लोर

पेन्शनधारकांसाठी खास सुविधा!; व्हिडिओ कॉलद्वारे सादर करा जीवन प्रमाणपत्र

SBI pensioners : एसबीआयने पेन्शनधारकांसाठी खास वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाइटमुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनशी संबंधित अनेक कामे सुलभ होणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 1 नोव्हेंबर 2021 पासून पेन्शनधारकांसाठी एक नवीन सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत बँकेतील पेन्शन खातेधारक घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. SBI ने या नवीन सुविधेचे नाव व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट ( Video Life Certificate Service) असं ठेवलं आहे. त्यामुळे ज्या पेन्शनधारकांना बँकेत जाणे शक्य नसेल ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात

एक सोपी, सुरक्षित पेपरलेस आणि मोफत सुविधा आहे. यामध्ये पेन्शनधारकाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्ड आवश्यक असेल. यासाठी निवृत्तीवेतनधारकांना अधिकृत वेबसाइट https://www.pensionseva.sbi/ ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ड्रॉप डाउनमधून 'व्हिडिओ एलसी' निवडल्यानंतर तुमचा एसबीआय पेन्शन खाते क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. यानंतर पेन्शनधारकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी सबमिट करुन नियम आणि अटी स्वीकारा आणि 'स्टार्ट जर्नी' वर क्लिक करा अशी माहिती एसबीआय प्रशासनानं दिली आहे. 

>> यासाठी पॅन कार्ड आवश्यक 

* व्हिडिओ कॉल दरम्यान पॅन कार्ड तयार ठेवल्यानंतर, 'मी तयार आहे'  हा पर्याय निवडा

* व्हिडिओ कॉल सुरू करण्यासाठी, कॅमेरा, मायक्रोफोन आणि स्थानाशी संबंधित परवानग्या द्या.

* SBI अधिकारी व्हिडिओ कॉलवर येईल.

* आपण इच्छेनुसार आपल्या सोयीनुसार व्हिडिओ कॉल शेड्यूल करू शकता.

* व्हिडिओ कॉल सुरू झाल्यावर पेन्शनधारकाला पडताळणी कोड मिळेल. तो संबंधित अधिकाऱ्यांना सांगा.

* व्हिडिओ कॉलवर तुमचे पॅन कार्ड दाखवा. एसबीआय अधिकारी ते कॅप्चर करतील

* एसबीआय अधिकारी पेन्शनधारकांचा फोटोही काढतील आणि त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.

नोंदणीसाठी खालील पर्याय वाचा
एसबीआयने पेन्शनधारकांसाठी खास वेबसाईट तयार केली आहे. पेन्शनधारकाला या वेबसाइटवर प्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ते सहजपणे लॉग इन करून वापरु शकता. या वेबसाइटमुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनशी संबंधित अनेक कामे सुलभ होणार आहेत. वेबसाईटद्वारे, वापरकर्ते थकबाकी गणना पत्रक डाउनलोड करू शकतात.

तुम्ही वेबसाइटद्वारे पेन्शन स्लिप किंवा फॉर्म-16 देखील डाउनलोड करू शकता. याशिवाय पेन्शन प्रोफाइल तपशील, गुंतवणुकीची माहिती आणि जीवन प्रमाणपत्राची स्थिती देखील तपासली जाऊ शकते. बँकेत केलेल्या व्यवहारांची माहितीही या वेबसाइटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

परंतु अफरातफरी पासून सावध राहा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, नंतर काढून ठेवलं; भाषणात म्हणाले, उद्या फोटो बघा!
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, नंतर काढून ठेवलं; भाषणात म्हणाले, उद्या फोटो बघा!
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
Badlapur School Case : बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
Salim Javed The Angry Young Man : 24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Railway Station : चिमुकलींवर अतिप्रसंग, नागरिक संतप्त; बदलापूर स्टेशवर तणावाचं वातावरणGirish Mahajan at Badlapur : बदलापूरच्या आंदोलनात गिरीशमहाजनांच्या दिशेने फेकली बॉटलGirish Mahajan At Badlapur Station : चिमुकलींवर अत्याचार; बदलापूरकर संतापले; महाजनांकडून संवादGirish Mahajan At Badlapur Station : महाजनांच्या आश्वासनांचा परिणाम नाही? आरोपीला फाशी द्या, आंदोलक ठाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, नंतर काढून ठेवलं; भाषणात म्हणाले, उद्या फोटो बघा!
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, नंतर काढून ठेवलं; भाषणात म्हणाले, उद्या फोटो बघा!
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
Badlapur School Case : बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
Salim Javed The Angry Young Man : 24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
Badlapur School News: बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, स्टेशनवर तुफान दगडफेक, पोलिसांनी शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली
बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, तुफान दगडफेक, शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली
Badlapur School: जे घडलंय ते घृणास्पद, पण शाळेवर राग काढू नका, बोलता बोलता शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटून आला
जे घडलंय ते घृणास्पद, पण शाळेवर राग काढू नका, बोलता बोलता शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटून आला
Badlapur Case : चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणी नागरिकांचा उद्रेक, आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर गृहमंत्र्यांकडून SIT ची घोषणा
चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणी आंदोलनाला हिंसक वळण; गृहमंत्र्यांकडून SIT ची घोषणा
Badlapur School News : Local Protest पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना रेल्वे ट्रॅक खाली करण्याचं आवाहन
Badlapur School News : Local Protest पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना रेल्वे ट्रॅक खाली करण्याचं आवाहन
Embed widget