(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SBI च्या 'या' खास योजनेत गुंतवणूक करा, कमी काळात अधिक नफा मिळवा, लाभ घेण्यासाठी उरले फक्त 20 दिवस
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) आपल्या ग्राहकांना लाभ देण्यासाठी विशेष एफडी योजना (FD Scheme) सुरू केली आहे. या योजनेची अंतिम संपत आली आहे.
SBI Amrit Kalash Scheme: बँका ग्राहकांसाठी विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून लोकांना चांगला परतावा मिळत आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) आपल्या ग्राहकांना लाभ देण्यासाठी विशेष एफडी योजना (FD Scheme) सुरू केली आहे. या योजनेची अंतिम संपत आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च ही अंतिम तारीख आहे.
अमृत कलश FD योजनेअंतर्गत बँक ग्राहकांना मजबूत व्याजदर
फिक्स्ड डिपॉझिट योजना ही गुंतवणूकदारांसाठी नेहमीच बचतीचे एक सुरक्षित साधन आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना लाभ देण्यासाठी विशेष FD योजना सुरू केली आहे. त्याचे नाव SBI अमृत कलश एफडी योजना आहे. या योजनेअंतर्गत बँक ग्राहकांना मजबूत व्याजदर देत आहे. अमृत कलश योजनेची अंतिम मुदत 31 मार्च 2024 रोजी संपत आहे. एसबीआयने अद्याप मुदत वाढवण्याची कोणतीही घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे गुंतवणूक करण्याची शेवटची संधी आहे.
गुंतवणुकीसाठी उरले फक्त 20 दिवस
SBI अमृत कलश योजना, SBI च्या लोकप्रिय FD योजनांपैकी एक आहे. 12 एप्रिल 2023 रोजी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बँक सामान्य ग्राहकांना 400 दिवसांच्या एफडीवर 7.1 टक्के व्याजदर देत आहे. यापूर्वी अमृत कलश योजनेची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 रोजी संपत होती. ती 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे फक्त 20 दिवस शिल्लक आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना अधिक लाभ
SBI अमृत कलश योजनेंतर्गत, बँक सामान्य ग्राहकांना 400 दिवसांच्या FD योजनेवर 7.1 टक्के व्याज दर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना त्यावर 7.60 टक्के व्याज मिळत आहे. टीडीएस कापल्यानंतर बँक खात्यात व्याज जमा करते. हा टीडीएस आयकर स्लॅबच्या आधारावर लागू होतो. अमृत कलश योजनेंतर्गत ग्राहक कमाल 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
अमृत कलश योजनेत खाते कसे उघडाल?
जर तुम्हाला SBI च्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या SBI शाखेत जाऊन अमृत कलश FD खाते उघडू शकता. याशिवाय ग्राहक इंटरनेट बँकिंग आणि एसबीआय योनो ॲपद्वारे एफडी खाते उघडू शकतात.
महत्वाच्या बातम्या: