(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SBI देशातील 5वी सर्वात मोठी फर्म, 'या' दिग्गज कंपनीला टाकलं मागे
स्टेट बँक ऑफ इंडियासाठी (SBI) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एसबीआयनं बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील 5 व्या क्रमांकाची सर्वात मोठी फर्मचा दर्जा प्राप्त केलाय.
SBI 5th Largest Firm in MCAP: स्टेट बँक ऑफ इंडियासाठी (SBI) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एसबीआयनं बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील 5 व्या क्रमांकाची सर्वात मोठी फर्मचा दर्जा प्राप्त केला आहे. सरकारी बँकांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या एसबीआयने आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसला मागे टाकून पाचवे स्थान पटकावले आहे. दरम्यान, बुधवारी, एसबीआयच्या समभागांनी प्रति शेअर 777.50 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. दरम्यान, SBI चे बाजार भांडवल इन्फोसिसपेक्षा 1228.48 कोटींनी अधिक झाले आहे.
SBI चे बाजार भांडवल किती?
दरम्यान, काल (21 फेब्रुवारी) व्यवहार बंद झाल्यानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मार्केट कॅप 6,88,578.43 कोटी रुपयांवर आले आहे. तर इन्फोसिसचे एमकॅप 6,87,349.95 कोटी रुपये होते. म्हणजेच SBI चे मार्केट कॅप इन्फोसिसच्या तुलनेत 1228.48 कोटी अधिक झाले आहे. त्यामुळं SBI ही देशातील 5वी सर्वात मोठी फर्म बनली आहे.
गुंतवणूकदारांना दिलासा देणारी बातमी
बाजार भांडवलाच्या बाबतीत SBI ने प्रगती केल्याचा फायदा गुंतवणूकदारांसाठी देखील आहे. कारण शेअर सातत्याने विक्रमी उच्चांकी पातळीवर आहेत. त्यामुळं याचा फायदा गुंतवणूकदारांनी होत आहे.
SBI BSE वर 5वी सर्वात मोठी कंपनी बनली
SBI ही BSE वरील बाजार मूल्यांकनाच्या दृष्टीने 5वी सर्वात मोठी फर्म बनली आहे. देशातील शीर्ष 5 कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेली ही एकमेव सरकारी बँक आहे. SBI ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. SBI च्या शेअर्समध्ये वाढीचा कल कायम आहे. गेल्या आठवड्यात त्यामध्ये मोठी वाढ झाली होती, त्याचा परिणाम बँकेच्या बाजार भांडवलावर (SBI मार्केट कॅप) देखील दिसून आला. सेन्सेक्सच्या टॉप-10 मौल्यवान कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठा नफा कमावला होता.
SBI ही भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना बँकिंग उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर करते. बचत खाती, एफडी आणि आरडी, तसेच गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड ही सर्व उदाहरणे आहेत. 1 जुलै 1955 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) स्थापना झाली होती. त्यानंतर, भारत सरकारनं 2008 मध्ये भारतीय स्टेट बँकेचे व्याज विकत घेतले होते.
महत्वाच्या बातम्या: