एक्स्प्लोर

TCS job scam : नोकरीच्या बदल्यात पैसे, 100 कोटींची लाचखोरी, टीसीएसने 4 अधिकाऱ्यांना केलं बडतर्फ

टीसीएस कंपनीनं चार अधिकाऱ्यांना बडतर्फ केलंय.  त्यासोबतच तीन स्टाफिंग फर्मवर बंदी देखील घातली आहे. टीसीएसनं यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेय. 

TCS job scam : टीसीएस (Tata Consultancy Services Ltd) ही भारतातील बड्या आयटी कंपनीपैकी एक मानली जाते. मात्र, टीसीएसमध्ये (TCS)नोकरीच्या बदल्यात लाचखोरी झाल्याचं उघड झालं आहे. जवळपास 100 कोटी रुपयांची लाच घेतली असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी टीसीएस कंपनीनं चार अधिकाऱ्यांना बडतर्फ केलंय.  त्यासोबतच तीन स्टाफिंग फर्मवर बंदी देखील घातली आहे. टीसीएसनं यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेय. 

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services Ltd (TCS)) या बड्या आयटी कंपनीत लाच देऊन नोकर भरतीचा घोटाळा उघडकीस आला आहे. एका अहवालानुसार, कंपनीचे काही वरिष्ठ अधिकारी त्यांच्या उमेदवारांना नोकऱ्या देण्याच्या बदल्यात स्टाफिंग फर्म्सकडून लाच घेत होते. अनेक वर्षांपासून कंपनीत हे प्रकार सुरु होते. आता घोटाळा उघडकीस आल्यानंतर टाटा समूहाची कंपनी टीसीएसने तातडीने कारवाई केली. कंपनीने आपल्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुप (आरएमजी)मधून चार अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आणि ३ स्टाफिंग फर्मवर बंदी घातली. 

एका व्हिसलब्लोअरने कंपनीच्या सीईओ आणि सीओओला पत्र लिहून आरएमजीचे ग्लोबल हेड ईएस चक्रवर्ती उमेदवारांना नियुक्ती देताना स्टाफिंग फर्म्सकडून लाच घेत आहेत, असा दावा केला. या आरोपांच्या चौकशीसाठी कंपनीकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली गेली. आणि चौकशीनंतर टीसीएसने आपल्या भरती प्रमुखांना रजेवर पाठवले आणि चार आरएमजी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. गेल्या 3 वर्षांत टीसीएसनं कंत्राटी भरतीसह 3 लाख लोकांना कामावर घेतले आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांनी कमिशनच्या माध्यमातून किमान 100 कोटी रुपये कमावले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, ह्या प्रकरणी टीसीएसकडून घोटाळा झालाच नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. 

टीसीएसकडून सांगण्यात आलंय की कोणताही घोटाळा झाला नसून काही कर्मचारी आणि स्टाफिंग फर्मकडून नियमांचा भंग झालाय. कंपनीतील भरती प्रक्रिया रिसोर्स मॅनेजमेंट ग्रूपकडून हाताळली जात नाही. सोबतच कंपनीतील कोणताही प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती यात सहभागी असल्याचं आढळलं नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आले आहे.  दरम्यान, असं असलं तरी दुसरीकडे विविध प्रकल्पांसाठी माणसं उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आरएमजीवर असल्याचं टीसीएसकडून मान्य करण्यात आलंय. दुसरीकडे, टीसीएस या घोटाळ्यात आर्थिक धक्का जरी लागला नसला तरी मेहनतीने उभ्या केलेल्या इमेजला मात्र धक्का लागला आहे हे मात्र नक्की. 

आणखी वाचा :

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेकडे टीम इंडियात मोठी जबाबदारी, संजू सॅमसनचेही संघात पुनरागमन 

BMC Covid Scam : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी ईडीच्या रडारवर, जैस्वाल यांच्यानंतर आणखी 2 अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget