Robert Kiyosaki : गुंतवणुकीचे सध्याचे सुरक्षित पर्याय कोणते? रिच डॅड पुअर डॅडचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी तीन पर्याय सांगितले
Robert Kiyosaki : आर्थिक साक्षरतेसंदर्भातील लोकप्रिय पुस्तकाचे लेखक रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय सांगितले आहेत.

नवी दिल्ली : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध नुकतंच थांबलं आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील शस्त्रसंधीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. या युद्धाच्या काळात जगभरातील शेअर बाजारांवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर राबवलेल्या आर्थिक धोरणांचा फटका देखील पाहायला मिळाला आहे. याशिवाय अमेरिकेनं रेसिप्रोकल टॅक्सच्या अंमलबजावणीसाठी दिलेली मुदतवाढ 9 जुलै रोजी संपणार आहे. याशिवाय जगभरात विविध देशात होणाऱ्या संघर्षाचा देखील अर्थव्यवस्थेवर परिणाम होतं असतो. या अस्थिर आर्थिक स्थितीमध्ये रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय सुचवले आहेत.
चांदी गुंतवणुकीचा चांगला पर्याय
रॉबर्ट कियोसाकी यांनी जून 2025 मध्ये चांदी हा गुंतवणुकीचा उत्कृष्ठ पर्याय असल्याचं म्हटलं आहे. सोने आणि बिटकॉईनचे दर सध्या खूप जास्त आहेत. मी यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सोने आणि बिटकॉईनचे दर लवकरच कोसळावेत. रॉबर्ट कियोसाकी यांनी ते असा विचार करत असल्याचं म्हटलं. तुम्ही तुमचं संशोधन करा, काळजी घ्या, असं रॉबर्ट कियोसाकी यांनी एका एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जागतिक संकटाचा इशारा?
इतिहासातील सर्वात मोठा कर्जाचा फुगा फुटेल तेव्हा तुम्ही श्रीमंत व्हाल की गरीब व्हाल असा प्रश्न रॉबर्ट कियोसाकी यांनी केला आहे. तुमच्याकडे सोने, चांदी आणि बिटकॉईन असणं आवश्यक आहे. जागतिक कर्जाचा फुगा फुटेल तेव्हा तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्याकडे सोने, चांदी आणि बिटकॉईन असणं आवश्यक आहे. विशेषत : बाँड्समध्ये बचत करणाऱ्यांना सर्वाधिक नुकसान होईल, असा अंदाज रॉबर्ट कियोसाकी यांनी वर्तवला आहे.
तुम्हाला विजेता व्हायचं असेल आणि श्रीमंत व्हायचं असेल तर कार्यवाही करा,ज्यांच्याकडे पैशांबद्दल कालबाह्य कल्पना आहेत ते गरीब होत आहेत, असं रॉबर्ट कियोसाकी म्हणाले.
GLOBAL MONETARY COLLAPSE COMING?
— Robert Kiyosaki (@theRealKiyosaki) June 23, 2025
Will you be richer or poorer when biggest debt bubble in history bursts.
I recommend owning gold, silver, and BITCOIN if you want to be richer when the Global Debt Bubble bursts.
BIGGEST LOSERS will be savers of fake fiat money and especially…
रॉबर्ट कियोसाकी कोण आहेत?
रॉबर्ट कियोसाकी यांनी आर्थिक साक्षरतेसंदर्भातील लोकप्रिय पुस्तक रिच डॅड पुअर डॅडचं लेखन केलं आहे. यामध्ये त्यांनी श्रीमंत माणसं पैशांचा वापर कसा करतात, गरीब व्यक्ती पैशाचा वापर कसा करतात. गरीब व्यक्तींचं पैशांचं व्यवस्थापन यासंदर्भातील भाष्य त्या पुस्तकात आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी आर्थिक साक्षरतेसंदर्भात दिलेले दाखले आज अनेक जण फॉलो करतात. आर्थिक साक्षरतेबाबत त्यांनी इतर पुस्तकांचे लेखन देखील केलं आहे.
























