जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये एकही भारतीय नाही, 'ही' आहेत टॉप-5 श्रीमंत कुटुंब
भारतात अब्जाधीशांची (Billionaires) कमतरता नाही. तरीही जगातील टॉप-5 श्रीमंत कुटुंबांच्या यादीत एकही भारतीय (Indian) कुटुंब नाही.
World Top Most Rich : भारतात अब्जाधीशांची (Billionaires) कमतरता नाही. तरीही जगातील टॉप-5 श्रीमंत कुटुंबांच्या यादीत एकही भारतीय (Indian) कुटुंब नाही. भारताचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) देखील या श्रेणीत येत नाहीत. भारतात आज 160 हून अधिक अब्जाधीश आहेत. यातील अनेकांची मालमत्ता ही एखाद्या व्यक्तीची नसून संपूर्ण कुटुंबाची मालमत्ता आहे. असे असूनही, जगातील टॉप-5 श्रीमंत कुटुंबांमध्ये एकही भारतीय कुटुंब येत नाही. आज आपण जगातील 5 श्रीमंत कुटुंब कोणती? याबाबतची माहिती पाहणार आहोत.
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब
ब्लूमबर्गनं जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी तयार केली आहे. 2023 मध्ये टॉप-5 कुटुंबांमध्ये अमेरिका आणि आखाती देशांचे वर्चस्व आहे. या कुटुंबांचा व्यवसाय जगभर पसरला आहे.जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणजे संयुक्त अरब अमिरातीचा भाग असलेल्या अबू धाबीचे राजघराणे. अल नहयान फॅमिली किंवा 'हाऊस ऑफ नहयान' या यादीत सर्वात वर आहे. या कुटुंबाची संपत्ती 305 अब्ज डॉलर्स आहे, जी अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे. नहयान कुटुंबाच्या संपत्तीत मोठे योगदान म्हणजे तेल आणि रिअल इस्टेट व्यवसायात त्यांची जबरदस्त पकड आहे.
वॉल्टन कुटुंब दुसऱ्या स्थानावर
टॉप श्रीमंत कुटुंबांच्या यादीत जगातील सर्वात मोठी रिटेल चेन वॉलमार्ट चालवणारे वॉल्टन कुटुंब दुसऱ्या स्थानावर आहे. या कुटुंबाची संपत्ती सुमारे 259.7 अब्ज डॉलर्स आहे. ही कंपनी वॉलमार्ट नावाने जगातील अनेक देशांमध्ये रिटेल चेन चालवते. ही कंपनी भारतात Flipkart आणि PhonePe ची देखील मालक आहे.
लक्झरी ब्रँडचे कुटुंब तिसऱ्या स्थानी
लक्झरी ब्रँड 'हर्मीस'चे मालक असेलेले कुटुंब जगातील तिसरे श्रीमंत कुटुंब आहे. त्यांची संपत्ती 150.9 अब्ज डॉलर्स आहे.
मार्स कुटुंब जगातील चौथे श्रीमंत कुटुंब
अमेरिकेच्या मार्स कुटुंबाकडे पेडिग्री सारख्या पाळीव प्राण्यांचे खाद्य ब्रँड आणि स्निकर्स सारख्या चॉकलेट ब्रँडचे मालक आहेत. हे जगातील चौथे श्रीमंत कुटुंब आहे. त्यांची एकूण संपत्ती 140.9 अब्ज डॉलर्स आहे. टॉप-5 च्या यादीत भारतातील एकाचाही समावेश नाही. पण टॉप-10 च्या यादीत मुकेश अंबानी यांचे कुटुंब 8 व्या क्रमांकावर आहे. अंबानी कुटुंबाची एकूण संपत्ती 89.9 अब्ज डॉलर आहे.
कतारच्या राजघराण्याची एंट्री
या वर्षी कतारच्या राजघराण्याने जगातील टॉप-5 श्रीमंत कुटुंबांच्या या यादीत जबरदस्त एंट्री केली आहे. अल थानी कुटुंब 133 डॉलर अब्ज संपत्तीसह जगातील पाचवे सर्वात श्रीमंत कुटुंब आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
सर्वाधिक पैसा कमावणारी देशातील 3 राज्ये कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर?