Retirement plan: निवृत्तीनंतरही पैशाचे टेन्शन नाही! असे नियोजन करा, महिना मिळवा एक लाख रुपये
निवृत्तीनंतरही अनेकांना पैशांची गरज लागते. नियमित उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाल्यानंतर, लोकांना मासिक खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
National Pension System : निवृत्तीनंतरही अनेकांना पैशांची गरज लागते. नियमित उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाल्यानंतर, लोकांना मासिक खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला दरमहा लाखो रुपयांचे पेन्शन मिळू शकते. तुम्हाला दर महिन्याला फक्त काही पैसे गुंतवावे लागतील.
18 ते 70 वयोगटातील नागरिक NPS अंतर्गत गुंतवणूक करु शकतात
केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा एक लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. सरकारी कर्मचारी, खासगी क्षेत्रातील कर्मचारी किंवा इतर कोणीही यामध्ये गुंतवणूक करु शकतात. 18 ते 70 वयोगटातील नागरिक NPS अंतर्गत गुंतवणूक करु शकता.
निवृत्तीसाठी NPS हा उत्तम पर्याय
निवृत्तीचे वय जसजसे जवळ येते तसतसे लोक गुंतवणुकीबद्दल चिंतित होतात. कुठे गुंतवणूक करावी हे ठरवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही एनपीएसमध्ये गुंतवणूक करु शकता. तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये 70 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. मात्र, त्यात लवकरात लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर अधिक नफा मिळतो. राष्ट्रीय पेन्शन योजना 1 जानेवारी 2004 रोजी सुरू करण्यात आली होती. ती 2009 मध्ये खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी खुली करण्यात आली होती.
राष्ट्रीय पेन्शन योजनेचा तपशील
राष्ट्रीय पेन्शन योजना ही ऐच्छिक आणि दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. केंद्र सरकारचा हा सामाजिक सुरक्षा उपक्रम आहे. अनिवासी भारतीय देखील या पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकतात. खाते उघडल्यापासून 60 वर्षे किंवा 20 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीपर्यंत योगदान द्यावे लागते. योगदान जेवढे जास्त तेवढे पेन्शन जास्त. या योजनेत सरासरी परतावा 9 टक्के ते 12 टक्के असू शकतो.
एक लाखासाठी किती गुंतवणूक करावी लागेल
जर तुम्ही 30 वर्षांसाठी दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मासिक पेन्शन रुपये 1 लाख असेल, तर निवृत्तीनंतर तुम्हाला सुमारे 1 कोटी रुपयांची एकरकमी रक्कम मिळेल. या योजनेत इक्विटी एक्सपोजर 50 ते 75 टक्के आहे.
कर लाभ
जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला करबचतीचा लाभही मिळेल. तुम्ही कलम 80CCD (1) अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत आणि कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. NPH योजनेत सरकारी कर्मचारी, खासगी क्षेत्रातील कर्मचारी किंवा इतर कोणीही यामध्ये गुंतवणूक करु शकतात.
महत्त्वाच्या बातम्या: