एक्स्प्लोर
घाऊक किमतींमुळे किरकोळ महागाई वाढली, डिसेंबरमध्ये 5.72%, जानेवारीत 6.52%
Consumer Price Index : यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर 5.72 टक्क्यांवर आला होता.
Retail Inflation Data : जानेवारीमध्ये किरकोळ महागाई वाढली आहे. किरकोळ महागाईचा दर जानेवारीत 6.52 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 3 महिन्यांचा हा महागाईचा उच्चांक ठरला आहे. यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर 5.72 टक्क्यांवर आला होता. 13 फेब्रुवारी रोजी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) जारी केलेल्या आकडेवारीतून महागाईने उच्चांक गाठला असल्याचं उघड झाले आहे.
महागाईची आकडेवारी समोरी आलेली पाहता, महागाई पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेच्या समाधानकारक पातळीच्या वर गेली आहे. महागाई रिझर्व्ह बँकेच्या 6 टक्क्यांच्या वरच्या मर्यादेच्या पलीकडे आहे. चलनविषयक धोरणाचा विचार करताना, आरबीआय मुख्यत्वे किरकोळ महागाईकडे लक्ष देते. चलनवाढ 2 टक्क्यांच्या श्रेणी सह 4 टक्क्यांवर ठेवण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँकेवर सोपवण्यात आली आहे.

Retail inflation rises to 3-month high of 6.52 pc in January: Govt data
— Press Trust of India (@PTI_News) February 13, 2023
महागाई कमी जास्त होण्याची काही ठळक कारणं पाहुया
जानेवारी 2022 मध्ये महागाई दर 6.01 टक्के होता
जानेवारी 2022 मध्ये महागाई दर 6.01 टक्के होता
ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई डिसेंबरमध्ये 5.72 टक्के आणि जानेवारी 2022 मध्ये 6.01 टक्के होती. डिसेंबरमध्ये 4.19 टक्क्यांच्या तुलनेत जानेवारीत खाद्यपदार्थांची महागाई 5.94 टक्क्यांवर होती. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर ६.७७ टक्क्यांच्या उच्चांकावर होता.
डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन वाढ 4.3 टक्क्यांवर घसरली
डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन वाढ 4.3 टक्क्यांवर घसरली
विशेष म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादनाची वाढ ४.३ टक्क्यांवर आली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये औद्योगिक उत्पादन ७.३ टक्क्यांनी वाढले होते. शुक्रवारी म्हणजेच10 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. परंतु वार्षिक आधारावर तुलना केल्यास औद्योगिक उत्पादनात वाढ झाली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये औद्योगिक उत्पादनात एक टक्क्याने वाढ झाली.
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 मध्ये उत्पादन क्षेत्राच्या उत्पादनात 2.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी या क्षेत्राचे उत्पादन ०.६ टक्क्यांनी वाढले होते. नोव्हेंबर 2022 मध्ये, उत्पादन क्षेत्राच्या उत्पादनात 6.4 टक्के वाढ झाली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement