(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPO Update :यामाहाची दोन शोरूम अन् केवळ 8 कर्मचारी, 12 कोटींच्या आयपीओवर 2700 कोटींची बोली, गुंतवणकदारांनी पैशाचा पाऊस पाडला
IPO Update : रिसोर्सफुल ऑटोमोबाइल कंपनीच्या आयपीएमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 117 रुपये आहे. या आयपीओची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत केवळ दोन शोरुम, आठ कर्मचारी असलेल्या रिसोर्सफुल ऑटोमोबाइलकडे यामाहाच्या डीलरशीपचे दोन शोरुम आहेत. रिसोर्सफुल ऑटोमोबाइलचा आयपीओ तब्बल 412 पट अधिक सबस्क्राइब करण्यात आला. या आयपीओची किंमत 12 कोटी असून त्यावर 2700 कोटी रुपयांची बोली लागली. ग्रे मार्केटमध्ये देखील रिसोर्सफुल ऑटोमोबाइलच्या शेअर्सची जोरदार चर्चा आहे.
गुंतवणूकदारांनी पैशांचा पाऊस पडला
रिसोर्सफुल ऑटोमोबाइलच्या आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 117 रुपये आहे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा शेअर105 रुपयांच्या प्रीमियवर ट्रेड करत आहे. यानुसार या आयपीओचा शेअर लिस्ट होताना त्याची किंमत 222 रुपये असू शकतो. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांनी यामध्ये पैसे लावले आहेत त्यांना 90 टक्के फायदा होऊ शकतो.
रिसोर्सफुल ऑटोमोबाइलचा आयपीओ 412.65 पट सबस्क्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल गुंतकवणूकदारांचा कोटा 484.26 पट सबस्क्राइब झाला आहे. नॉन इन्स्टिट्यूशनल इनवेस्टर्सच्या प्रवर्गात 315.23 पट गुंतवणूक झाली आहे. कंपनीच्या आयपीओत गुंतवणूकदार केवळ एका लॉटसाठी गुंतवणूक करु शकतात. एका लॉटमध्ये 1200 शेअर्स आहेत. यासाठी रिटेल गुंतवणूकदारांना कमीत कमी 1 लाख 40 हजार 400 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
रिसोर्सफुल ऑटोमोबाइलची सुरुवात 2018 मध्ये झाली होती. ही कंपनी साहनी ऑटोमोबाइलच्या द्वारे दुचाकी वाहनांची विक्री करते. साहनी ऑटोमोबाइल ग्राहकांच्या अपेक्षेनुसार दुचाकी गाड्या उपलब्ध करुन देते. रिसोर्सफुल ऑटोमोबाइलची केवळ नवी दिल्लीत दोन शोरुम आहेत. एक शोरुम ब्लू स्क्वेअर द्वारका आणि पालम रोड नवी दिल्ली येथे आहे. 31 जुलैपर्यंतच्या माहितीनुसार कंपनीत 8 कायमस्वरुपी कर्मचारी आहेत.
रिसोर्सफुल ऑटोमोबाइल कंपनीच्या एसएमई आयपीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या कंपनीचा आयपीओ 22 ऑगस्टला लाँच करण्यात आला होता. रिसोर्सफुल ऑटोमोबाइलचा आयपीओ 29 ऑगस्टला लिस्टींग केला जाणार आहे. रिसोर्सफुल ऑटोमोबाईलनं आयपीओ नवी दिल्लीत दोन नवीन शोरुम सुरु करणं, कर्ज परतफेड आणि इतर कारणांसाठी आणला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ लिस्ट झाला होता. त्यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला होता. गेल्या आठवड्यात इंटररीच बिल्डींग प्रोडक्ट्सचा आयीपओ लिस्ट झाला होता. त्यातून गुंतवणूकदारांना जवळपास 44 टक्के परतावा मिळाला आहे.यूनिकॉमर्स कंपनीच्या आयपीओनं देखील गुंतवणूकदारांना 117 टक्के परतावा दिला आहे.
सध्या शेअर बाजारात प्रीमियर एनर्जीज, इकॉस मोबिलीटी आणि बाझार स्टाइल रिटेलचा आयपीओ लाँच झाला आहे.
इतर बातम्या :
Share Market : गुंतवणूकदारांनो सावधान! शेअर मोर्केटमध्ये नवा घोटाळा, नेमकी कशी होतेय फसवणूक?
पगाराएवढंच काम करा, कामानंतर मॅनेजर फोनही करू शकत नाही!, या देशानं थेट कायदाच केला..